काठमांडू -नेपाळचेपंतप्रधान केपी शर्मा ओली यांची खुर्ची गोत्यात आली आहे. सत्तारूढ नेपाळ कम्युनिस्ट पार्टीमध्ये सध्या गोंधळ माजला आहे. देशभरात सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. यामुळे लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी पंतप्रधान ओली आता कट्टर राष्ट्रवादाचा प्रयोग करू पाहत आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षात सुरू असलेल्या गोंधळासाठी नाव न घेता, थेट भारतालाच दोशी ठरवले आहे. यासंदर्भात त्यांनी, 'एक दूतावास माझ्या सरकारविरोधात हॉटेलमध्ये बसून कट आखत असल्याचा आरोप केला आहे.
भारतावर नाव न घेता केला आरोप -मदन भंडारी यांच्या 69 व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान केपी शर्मा ओली म्हणाले, भलेही त्यांना पंतप्रधान पदावरून हटविण्याचा खेळ सुरू असो, मात्र ते अशक्य आहे. ओली यांनी दावा केला होता, की काठमांडूच्या एका हॉटेलमध्ये त्यांना पदावरून बाजुला सारण्यासाठी बैठक सुरू आहे. तसेच यात एक दुतावासही सक्रिय आहे. असे म्हणताना ओली यांचा इशारा भारताकडे होता.
गलवान, पेंगाँगनंतर आता देपसांगवर चीनचा डोळा, नवा वाद उकरून काढण्याच्या तयारीत ड्रॅगन
नेपाळचे राष्ट्रीयत्व कमकुवत नाही -ओली यांनी दावा केला, की भारताचा भूभाग नेपाळच्या नकाशात दाखवण्यासंदर्भातील घटनादुरुस्तीपासून त्यांच्या विरोधात कट रचला जात आहे. मला पदावरून बाजूला करण्यासाठी उघडपणे प्रयत्न होत आहेत. नेपाळचे राष्ट्रीयत्व कमकुवत नाही. कुणीही विचार केला नव्हता, की नकाशा छापण्यासाठी एखाद्या पंतप्रधानाला पदावरू हटवले जाईल.
India China Tension : चीनचा सामना करण्यासाठी 'भीष्म' मैदानात, 'ही' आहे 'खासियत'
ओलींच्या पक्षात 'प्रचंड' वादळ -पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा पक्ष फुटण्याच्या स्थितीत आहे. नेपाच्या सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकारी चेअरमन पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांनी पंतप्रधान ओलींवर टीका करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच राजीनामा न दिल्यास, आपण पक्ष फोडू, असा इशाराही प्रचंड यांनी ओलींना दिला आहे. तसेच यावेळी ओली आपली खुर्ची वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. ते यासाठी नेपाळी सैन्याची मदत घेत आहेत. असा आरोपही प्रचंड यांनी केला आहे.
ओली यांचा राजीनामा देण्यास नकार -कम्युनिस्ट पार्टीच्या स्टँडिंग कमिटीच्या बैठकीतही अधिकांश सदस्यांनी पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, ओली यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.