कराची - पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील संघर जिल्ह्यातील खिप्रोमध्ये समाजकंटकांनी कृष्ण जन्माष्टमी दिवशीच कृष्ण मंदिरांची मोडतोड केली आहे. सोमवारी काही समाजकंटकांनी श्रीकृष्णाची मूर्ती तोडली. ही घटना मंदिरातजन्माष्टमी साजरी करण्यासाठी सुरू असलेल्या सोहळ्यादरम्यान घडली. या घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण आहे. परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मात्र आतापर्यं कुठल्याही आरोपीला अटक झालेली नाही. (Krishna Mandir demolished in Pakistan on Janmashtami day, devotees also beaten)
याबाबतची माहिती पाकिस्तानी अॅक्टिव्हिस्ट वकील राहत ऑस्टिन यांनी दिली आहे. त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून सांगितले की, मंदिरात जन्माष्टमीची पूजा सुरू असतानाच हा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये भाविकांना मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये हिंदून मारहाण होणे ही सामान्य बाब आहे. या महिन्याच्या सुरुवातीला लाहोरपासून सुमारे ५९० किलोमीटर अंतरावर रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरामध्ये शोकडो लोकांनी एका हिंदू मंदिराचे नुकसान केले होते.
मानवाधिकार संस्था मुव्हमेंट फॉर सॉलिडॅरिटी अँड पीसच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानमध्ये दरवर्षी एक हजार हून अधिक ख्रिश्चन आणि हिंदू महिला आणि मुलींचे अपहरण केले जाते. त्यानंतर त्यांचे धर्मपरीवर्तन करून इस्लामिक पद्धतीने त्यांचा निकाह केला जातो. पीडित महिला आणि मुलींचे सरासरी वय १२ ते २५ दरम्यान असते.
अधिकृत अंदाजानुसार सध्या पाकिस्तानमध्ये ७५ लाख हिंदू वास्तव्यास आहेत. यामधील बहुतांश हिंदू हे सिंध प्रांतामध्ये आहेत. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अल्पसंख्याक आणि बिगर इस्लामी धार्मिक संस्थ्यांवरील हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. गतवर्षी सिंधमध्ये माता रानी भटियानी मंदिर, गुरुद्वारा श्री जन्मस्थान खैबर पख्तुनख्वामधील कराक येथील हिंदू मंदिरासह पाकिस्तानमधील अनेक मंदिरांवर हल्ले झाले आहेत.