इस्लामाबाद : भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात जाहीर झालेल्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध, भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यात उत्तर सादर करण्याची तयारी पाकिस्तानने चालविली आहे.भारतातील निवृत्त नौदल अधिकारी असलेल्या ४६ वर्षीय जाधव यांना मार्च २0१६ मध्ये बलुचिस्तानात अटक केल्याचा दावा पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केला होता. पाकच्या लष्करी न्यायालयाने त्यांना हेरगिरी आणि घातपाती कारवायांच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा ठोठावली आहे.भारताने दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी हेगच्या आंतरराष्टÑीय न्यायालयाने पाकिस्तानला लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश १३ डिसेंबर रोजी दिले होते.पाकिस्तानी विदेश मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल अश्तर औसाफ अली यांनी शुक्रवारी कायदे तज्ज्ञ आणि विदेश मंत्रालय, तसेच अन्य संबंधित मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेतली. आम्ही आमचे म्हणणे जोरकसपणे सादर करू, असे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
कुलभूषण जाधवप्रकरणी पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय न्यायालयात देणार उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 2:27 AM