शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
2
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
3
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
4
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
5
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
6
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
7
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
8
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
9
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
10
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
11
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
12
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
13
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
14
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
15
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
16
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
17
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
18
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
19
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
20
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा

कुवैतमध्ये आगीत होरपळून 45 भारतीयांचा मृत्यू; मृतदेह आणण्यासाठी वायुसेनेचे विमान पोहोचले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 10:04 PM

या घटनेनंतर परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी थेट कुवैत गाठले.

Kuwait Fire : कुवेतच्या मंगाफ शहरातील एका सात मजली इमारतीत बुधवारी सकाळी भीषण आग लागली, ज्यामध्ये 45 भारतीयांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह जखमी भारतीयांना मदत करण्यासाठी आणि मृतदेह भारतात आणण्यासाठी कुवेतला पोहोचले असून, भारतीय वायुसेनेच्या विमानाद्वारे मृतदेह परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

कुवेतला पोहोचल्यानंतर कीर्तीवर्धन सिंह यांनी कुवेतचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अली अल-याह्या यांची भेट घेतली. कुवेतमधील भारतीय दूतावासाने सांगितले की, अल-याह्या यांनी वैद्यकीय मदत, शक्य तितक्या लवकर मृतदेह परत आणण्यासह संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच कीर्तीवर्धन सिंग यांनी मुबारक अल कबीर हॉस्पिटललाही भेट दिली, जिथे सात जखमी भारतीय दाखल आहेत. कीर्तीवर्धन सिंग यांनी त्यांना भारत सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

मृतांपेकी बहुतांश केरळमधील वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, कुवेतचे पहिले उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री शेख फहद अल-युसेफ अल-सबाह यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी 48 मृतदेहांची ओळख पटवली असून त्यापैकी 45 भारतीय आणि तीन फिलिपिनो आहेत. उर्वरित मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांपैकी बहुतांश केरळमधील आहेत.

घटनेनंतर भारत सरकार सक्रियबुधवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, एनएसए अजित डोवाल, परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा आणि पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा आणि इतरांशी कुवेत आगीच्या घटनेसंदर्भात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी मृत भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयIndiaभारतairforceहवाईदलfireआग