ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - निरमा हा साबणापासून ते सीमेंटपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये असलेला उद्योगसमूह लाफार्ज होलसीमची लाफार्ज इंडिया ही कंपनी 1.4 अब्ज डॉलर्सना विकत घेत आहे. लाफार्जनेच सोमवारी या सौद्याची घोषणा केली असून भारतातले कंपनीचे तीनही सीमेंट प्रकल्प व दोन ग्राइंडिंग प्रकल्प, ज्यांची एकत्रित क्षमता 11 दशलक्ष टन आहे, निरमाच्या मालकिचे होणार आहेत. या पैशाचा वापर कर्जफेडीसाठी करण्यात येणार असल्याचे लाफार्जने म्हटले आहे.
करसनभाई पेटल यांनी स्थापन केलेला 1.1 अब्ज डॉलर्सचा निरमा हा समूह साबणापासून ते सोडा अॅश व सीमेंटच्या उत्पादनता असून कंपनीचे भारतात व अमेरिकेत मिळून एकूण 12 उत्पादन प्रकल्प आहेत.
लाफार्ज व होलसीम या जगातल्या सीमेंट उत्पादनातल्या आघाडीच्या कंपन्या आहेत, ज्या 2014मध्ये एकमेकात विलिन झाल्या. एसीसी व अंबुजा सीमेंट या लाफार्जहोलसीमच्या मालकिच्या कंपन्या असून त्यांच्या माध्यमातून भारतात व्यवसाय सुरू राहणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.