लाहोरथंडी आणि कोरोना या दोघांचीही चिंता न करता पाकिस्तानात 'डेमोक्रॅटीक मूव्हमेंट'च्या 'लाहोर जलसा'मध्ये तुडूंब गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. या विशाल रॅलीचं आयोजन पाकिस्तान मुस्लीम लीगने (पीएमएल-एन) केलं आहे.
लाहोरच्या मीनार-ए-पाकिस्तान मैदानात जमलेल्या गर्दीला संबोधित करण्यासाठी पीडीएमचे अध्यक्ष मौलाना फजलुर रहमान, 'पीएमएल-एल'च्या उपाध्यक्ष मरयम नवाज आणि पीपीपीचे अध्यक्ष बिलावान भुट्टो जरदारी देखील उपस्थित आहेत.
रॅली सुरु होण्याच्या काही तास आधीच मैदानात तुडूंब गर्दी झाली आणि लोकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इमरान सरकारचा लॉकडाउन सपशेल 'फेल' गेल्याचं दिसून येत आहे.
कारवाईचा इशाराइमरान सरकारने विरोधी पक्षांच्या या रॅलीला परवानगी नाकारली होती. नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारने रॅलीच्या ठिकाणी कोरोना व्हायरस स्मार्ट लॉकडाउन जाहीर केला होता. लॉकडाउन तोडणाऱ्याची धरपकड करुन तुरुंगात टाकलं जाऊ शकतं असा इशारा दिला होता.