लाहोर- आपल्या बातमीकडे लोकांचे आणि प्रशासनाचे लक्ष जावे यासाठी वेगवेगळे उपाय पत्रकार करत असतात. लाहोरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणाता पाऊस पडत असल्यामुळे सर्व शहराची वाताहत झालेली आहे. यामुळे शहरामध्ये पाणीही साठले आहे. ही पुराची स्थिती दाखविण्यासाठी पाकिस्तानातील एका पत्रकाराने लहान मुलांच्या अंघोळ, पोहोण्याच्या तलावातून बातमी दिली आहे. हवा भरुन फुगवायचे असे लहान मुलांना डुंबण्यासाठी असे बेबी पूल वापरले जातात.
लाहोर शहरात पाण्याचा नियचार न झाल्यामुळे वॉटर अँड सॅनिटेशन एजन्सी (वासा) वर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यामुळए या वार्ताहराने अशा पूलचा वापर करून बातमी दिली. आपण या पूलमध्ये एन्जॉय करत आहोत असेही त्याने बातमीमध्ये सांगितले. हा व्हीडिओ इंटरनेटवर आल्यावर सर्वांचेच लक्ष त्याकडे गेले. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.