शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

लखवीची तुरुंगात चैन

By admin | Published: March 01, 2015 11:34 PM

मुंबईतील २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर- ए- तैयबाचा कार्यवाहक कमांडर झकीऊर रेहमान लखवीची रावळपिंडीतील

इस्लामाबाद : मुंबईतील २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर- ए- तैयबाचा कार्यवाहक कमांडर झकीऊर रेहमान लखवीची रावळपिंडीतील आदियाला तुरुंगातही चांगलीच ऐश चालली आहे. मोबाईल, इंटरनेटरच्या मनसोक्त वापरासह दरदिवशी अनेकांच्या भेटीगाठी घेण्यातही त्याला कसलीही आडकाठी नाही.कडेकोट सुरक्षा असलेल्या आदियाल तुरुंगात लखवीसोबत अब्दुल वाजीद, मजहर इक्बाल, हमद अमीन सादिक, शाहीद जमील रियाझ, जमील अहमद व युनूस अंजुमन यांना डांबण्यात आले आहे. लखवीसह या सर्वांवर मुंबई हल्ल्याचा कट रचणे व हा कट तडीस नेण्याचा आरोप आहे. एवढे गंभीर आरोप असतानाही लखवी आणि त्याचे साथीदार तुरुंगात मौजमजा करीत आहेत.तुरुंगाधिकाऱ्याच्या परवानगीने त्यांना टेलिव्हिजन, मोबाईल फोन व इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एवढेच नाही तर त्याला दरदिवशी कधी आणि कोणाचीही भेट घेता येते, असे बीबीसी उर्दूचे वृत्त आहे. लखवी कधीही आणि वाटेल त्याला भेटतो. यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही. विशेष त्याला भेटणाऱ्यांना ओळख द्यायचीही गरज नाही. लखवी दरदिवशी १०० लोकांना भेटतो. हा प्रकार चकित करणारा वाटत असला तरी पाकिस्तानी प्रशासन तुरुंगातील अतिरेक्यांची भविष्यात गरज लागेल म्हणून त्यांचे चोचले पुरवीत असते. लखवी हा लष्कर- ए- तैयबा व जमात- ऊद- दावा या संघटनेचा संस्थापक हाफीज सईदचा जवळचा नातेवाईक असल्याचे समजते. (वृत्तसंस्था)