लाहोर : २००८च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी उर रेहमान लखवी याने आपल्या अटकेला दिलेले आव्हान, पाकिस्तानातील न्यायालयाने फेटाळले असून लखवी किमान आणखी महिनाभर तरी तुरुंगातच राहील असा निकाल दिला आहे. सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली लखवी सध्या तुरुंगात आहे. उच्च न्यायालयाचे न्या. मेहमूद मकबूल बाजवा यांनी लखवी (५५) याची याचिका फेटाळली. पंजाब सरकारने १४ मार्च रोजी लखवी याला सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली लख्वीस कारावासातच ठेवले होते. सरकारने माझ्या अशिलाला जामीन मिळाल्यानंतर चार वेळा अटक केली आहे. सरकार भारत व अमेरिकेच्या दबावामुळे ही कारवाई करीत आहे असा दावा लखवीचे वकील अब्बासी यांनी केला होता.(वृत्तसंस्था)
लख्वीचा मुक्काम तुरुंगातच; कोर्टाने याचिका फेटाळली
By admin | Published: March 20, 2015 11:45 PM