केरळी जोडप्याने ब्रिटनमध्ये जिंकली लोंबार्घिनी, १९ लाखांचे रोख बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 01:08 AM2020-07-12T01:08:41+5:302020-07-12T06:30:08+5:30

शिबू हे मूळचे केरळातील कोट्टयाम जिल्ह्यातील वोल्लूर येथील आहेत. कोची येथे ध्वनी अभियंता म्हणून ते काम करायचे. एक वर्षापूर्वी ते पत्नीसह ब्रिटनला स्थलांतरित झाले.

Lamborghini wins Rs 19 lakh cash prize in UK | केरळी जोडप्याने ब्रिटनमध्ये जिंकली लोंबार्घिनी, १९ लाखांचे रोख बक्षीस

केरळी जोडप्याने ब्रिटनमध्ये जिंकली लोंबार्घिनी, १९ लाखांचे रोख बक्षीस

Next

नॉटिंगहॅम : ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका केरळी जोडप्याने एका स्पर्धेत जगातील महागडी कार लोंबार्घिनी आणि १९ लाख रुपयांचे रोख बक्षीस जिंकले आहे. शिबू पॉल आणि लिनेट जोसेफ असे या जोडप्याचे नाव असून, ते दोघे नॉटिंगहॅम येथे राहतात. ‘बेस्ट आॅफ द बेस्ट’ने (बीओटीबी) आयोजित केलेल्या एका ‘लाईफस्टाईल’ स्पर्धेत त्यांनी ही बक्षिसे जिंकली आहेत.
शिबू हे मूळचे केरळातील कोट्टयाम जिल्ह्यातील वोल्लूर येथील आहेत. कोची येथे ध्वनी अभियंता म्हणून ते काम करायचे. एक वर्षापूर्वी ते पत्नीसह ब्रिटनला स्थलांतरित झाले. सुरुवातीला ते केंब्रिजला राहिले. नंतर नॉटिंगहॅमला स्थलांतरित झाले. त्यांची पत्नी लिनेट नॉटिंगहॅम सिटी हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून काम करते. कोरोना विषाणूच्या साथीत शिबू यांची नोकरी गेली.
अनेक ठिकाणी नोकरी शोधत असतानाच शिबू यांनी ‘बीओटीबी’ची प्रत्येकी ६ ते ७ पौंडाची तीन तिकिटे खरेदी केली होती. ‘बीओटीबी’चे प्रतिनिधी त्यांच्या घरी आले तेव्हा त्यांना विश्वास बसेना. खाली पायºयाजवळ त्यांची प्रतीक्षा करीत असलेली लक्झरी कार बघून ‘नाही, हे शक्यच नाही.’ असा पहिला उद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडला. प्रतिनिधींनी त्यांना आणखी एक धक्का देत सांगितले की, ‘तुम्ही २0 हजार पौंडांचे रोख पारितोषिकही जिंकले आहे.’
शिबू यांनी सांगितले की, ‘मी या स्पर्धेत तीन वेळा भाग घेतला होता. या स्पर्धेचे व्यसन लागू नये, अशी माझी इच्छा होती. मी यावेळी तिकिटांसाठी फॉर्म भरला आणि पूर्णत: विसरून गेलो होतो. माझी पत्नी नुकतीच रात्रपाळी करून घरी आली होती आणि पेंगत होती. आमच्या दरवाजाची बेल वाजली. दार उघडले तर आमच्यासाठी १,९५,000 पौंड किमतीची नवी कोरी लक्झरी कार २0 हजार पौंडांच्या रोख पारितोषिकासह दारात उभी होती. मी देवाचा खूप खूप आभारी आहे. मी माझ्या नोकरीसाठी चिंतेत असताना ही भेट देवाने आम्हाला दिली.’

कार नको, रोख पर्याय निवडणार
शिबू यांनी नवी कोरी लोंबार्घिनी कार स्वीकारण्याऐवजी तेवढ्या किमतीची रोख रक्कम स्वीकारण्याचा पर्याय निवडायचे ठरवले आहे. शिबू हे आपली जुनीच टोयोटा यारिस कार चालविणार आहेत. येणाºया पैशांतून नॉटिंगहॅममध्ये एक घर घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

Web Title: Lamborghini wins Rs 19 lakh cash prize in UK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.