इस्लामाबाद: मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या जकी-उर-रहमान लखवीला टेरर फंडिंग प्रकरणात अटक झाली आहे. दहशतवाद्यांना आर्थिक मदत दिल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या पंजाबमध्ये लखवीला अटक करण्यात आली. मात्र त्याच्या अटकेचा मुंबईवरील २६/११ हल्ल्याशी कोणताही संबंध नाही.जकी-उर-रहमान लखवीला अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला पंजाबच्या दहशतवादविरोधी विभागाच्या प्रवक्त्यांनी दुजोरा दिला. लखवीला लाहोरमधून अटक करण्यात आली. दवाखान्याच्या नावाखाली मिळणारा निधी दहशतवादी कारवायांसाठी वापरल्याचा आरोप लखवीवर आहे. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं लखवीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवादी घोषित केलं.
२६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड जकी-उर-रहमान लखवीला टेरर फंडिंग प्रकरणी अटक
By कुणाल गवाणकर | Published: January 02, 2021 3:42 PM