न्यूयॉर्क : भारतीय विद्यार्थिनी जान्हवी कंदुला हिच्या मृत्यूची हसून खिल्ली उडवणाऱ्या अमेरिकेतील पोलिस अधिकाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. घटनेच्या दीड वर्षांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
२३ जानेवारी २०२३ रोजी अमेरिकेतील सिएटलमध्ये जान्हवीला रस्ता ओलांडताना पोलिस अधिकारी केविन डेव्ह याच्या पेट्रोलिंग कारने धडक दिली होती. यावेळी कारचा वेग ताशी ११९ किमीपेक्षा जास्त होता.
यानंतर पोलिस अधिकारी डॅनियल ऑर्डर याने मृत जान्हवीची खिल्ली उडवत ९ लाखांचा एक चेक तिच्या नावे लिहून द्या, तशीही ती २३ वर्षांची होती, असे त्याने मस्तवालपणे म्हटले होते. यावेळी तो जोरजोरात हसलाही होता. याचा भारत सरकारने अमेरिकेकडे निषेधही नोंदवला होता. नंतर या प्रकरणाची पुन्हा चौकशी झाली.
आम्हाला लाज वाटते
सीएटल पोलिस विभागाचे प्रमुख स्यू राहन यांनी एका ई-मेलमध्ये म्हटले की, ऑर्डरर यांच्या वक्तव्यामुळे कंदुलाच्या कुटंबाला झालेले दु:ख दूर करता येणार नाही.
या कृतीमुळे सिएटल पोलिस आणि आमच्या वर्दीला लज्जित केले आहे. यामुळे प्रत्येक पोलिस अधिकाऱ्याला काम करणे कठीण झाले आहे.