ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 14 - रिओ ऑलिंपिकची क्रीडाजगताला उत्सुकता लागली आहे. अनेक स्पर्धक रिओ ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्यासाठी तयारी करत आहेत. रिओ ऑलिम्पिकचा ट्रेलर प्रसारित करण्यात आला आहे.
या ट्रेलरमध्ये जंगली प्राण्यांना थ्रीडी इफेक्टमध्ये संगीताची जोड देऊन रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयारी करताना दाखवण्यात आलं आहे. ब्राझीलमधलं निसर्गरम्य पावसाळी वातावरणाला डोळ्यांसमोर ठेवून हा ट्रेलर बनवण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये अनिमेशनच्या साहाय्यानं विविध प्रकारच्या प्राण्यांसोबतच निसर्गातली झाडंही दाखवण्यात आली आहेत.
या ट्रेलरमध्ये जंगलामध्ये प्राणी धावताना दाखवण्यात आले असून, रिओ ऑलिंपिकसाठी त्यांचं माणसांमध्ये परिवर्तन झाल्याचं चित्रीत करण्यात आलं आहे. या व्हिडीओमधल्या 90 सेकंदांमध्ये ब्राझीलच्या जनजीवन आणि संस्कृतिची झलक दिसत आहे. हा जवळपास दीड मिनिटांचा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरला असून, सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.