ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १३ - जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याला पाकिस्तानने ताब्यात घेतले आसल्याचं वृत्त पाक माध्यामांनी दिले आहे. मसूद अझहर याचा भाऊ रौफलाला याला ही ताब्यात घेण्यात आले आहे. पठाणकोट दहशतवादी हल्ल्यासंदर्भात चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पठाणकोटमधील दहशतवादी हल्यावर भारताने दिलेल्या पुराव्यानंतर पाकिस्तान सरकारची जैश ए मोहम्मद संघटनेवर कारवाई सुरु आहे. आत्तापर्यंत महसूद अजहर सोबतच २३ जणांना ताब्यात घेण्यात आले आले असुन त्यांची चौकशी सुरु आहे.
अजहर मसूद हा तोच दहशतवादी आहे, ज्याला १९९९ मध्ये अपहरण झालेल्या विमानाच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या कंदहारमध्ये सोडण्यात आलं होतं. पठाणकोट हवाईतळावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये सॅटेलाईट फोनद्वारे बातचीत केली होती. भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या सुत्रांनुसार, अजहर बहावलपूरमध्ये राहतो. तोच जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देतो.
२ जानेवारी रोजी भारतात पठाणकोट हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान स्थित जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे पुरावे भारताने पाकिस्तानला दिले होते. भारताने पठाणकोट हल्ल्यामधील दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडे केली होती.