ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. २२ - चीनमधील टियांजिन विद्यापीठात चक्क 'डेटिंग आणि फ्रेंडशिप' यावर आधारित एक कोर्स सुरु करण्यात आला आहे. विशेष बाब म्हजणे कोर्सच्या शेवटी जोडीदार शोधण्यात यशस्वी ठरणा-या विद्यार्थ्यांनाच पैकीच्या पैकी गुण मिळणार आहेत.
चीनमधील टियांजिन विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेतर्फे २०१६ च्या सुरुवातीपासून 'थिअरी इन लव्ह अँड डेटिंग' हा कोर्स सुरु करण्यात येणार आहे. ३२ तासांच्या या कोर्समध्ये प्रेम, डेटिंग आणि फ्रेंडशिप याचे धडे दिले जातील. ग्रुप डिस्कशन, सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी अशा विविध गोष्टींचा अभ्यासक्रमात समावेश असेल. या कोर्स संपत असताना जोडीदार शोधण्यात यशस्वी ठरणा-या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळतील अशी माहिती हा कोर्स सुरु करणारे काँग यांनी दिली. चीनमधील हा अभ्यासक्रम सुरु होण्यापूर्वीच चर्चेचा विषय ठरला आहे एवढ मात्र नक्की.