शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

इंडोनेशियातील भूकंपात आतापर्यंत 82 लोकांचा मृत्यू, 100हून अधिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 6:46 AM

इंडोनेशिया या देशाला भूकंपाचे जोरदार हादरे बसले आहेत.

जकार्ता- इंडोनेशिया या देशाला भूकंपाचे जोरदार हादरे बसले आहेत. या भूकंपामुळेइंडोनेशियामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानीसह वित्तहानी झाली आहे. आतापर्यंत या भूकंपात 82 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 100हून अधिक जण जखमी आहेत. लोम्बोक आयलँडजवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू दाखवण्यात आला आहे.  या भूकंपामुळे अनेक इमारतींचं नुकसान झालं असून, स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेनुसार या भूकंपाची तीव्रता सात रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू लोम्बोकच्या उत्तर भागातल्या जमिनीच्या 10.5 किलोमीटर खोलवर दाखवण्यात आला आहे. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, ते बाली द्विपसमूहापर्यंत जाणवले. या भूकंपानंतर त्सुनामीचाही इशारा देण्यात आला होता. परंतु आता त्सुनामी येणार नसल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे. भूकंपामुळे नुकसान झालेल्या इमारतीमध्ये विमानतळ टर्मिनल इमारतीचाही समावेश आहे. तीन गावांच्या समुद्रकिना-यावर फक्त 15 सेंटीमीटरपर्यंत लाटा उसळल्यानंतर सुनामीचा इशारा रद्द करण्यात आला आहे.लोम्बोक आपत्कालीन विभागाचे अधिकारी इवान अस्मारा म्हणाले, भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर माणसं भीतीनं घराबाहेर आली. तसेच कोसळलेल्या इमारतींमध्ये निकृष्ट दर्जाचं बांधकाम साहित्य वापरण्यात आलं होतं, असं इंडोनेशिया आपत्ती निवारण यंत्रणेचे प्रवक्ते सुतोपो पूर नोग्रोहो यांनी सांगितलं. मागील काही दिवसांपूर्वी इंडोनेशियातल्या लोम्बोकलाच भूकंपाचा फटका बसला होता. त्यावेळी आलेल्या भूकंपात जवळपास 14 जण जीवानिशी गेले होते, तर अनेक जण जखमी होते. भूकंपामुळे हजारो लोकांची घरं उद्ध्वस्त झाली होती. 

टॅग्स :IndonesiaइंडोनेशियाEarthquakeभूकंप