जकार्ता : इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर शुक्रवारी (28 सप्टेंबर) 7.5 रिश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का बसल्यानंतर काही वेळाने त्सुनामीचाही जोरदार फटका बसला आहे. इंडोनेशियाच्या जिओफिजिक्स खात्याने याबाबत माहिती दिली होती. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 832 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भुकंपामुळे पालू आणि डोंग्गाला या दोन शहरांचे सर्वात अधिक नुकसान झाले आहे. एएफपी या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.