शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचं आवाहन केलं; दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'लोकसभेला विशाल पाटील यांना मदत झाली, शिवसेनावाले क्षमा करा', भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली
3
"बटेंगे तो पॉकेट कटेंगे और भाजपावाले हटेंगे तो दाम घटेंगे", महागाईवरून काँग्रेसचा टोला
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंनी थेटच सांगितलं
5
कोरोना काळात केलेली व्हॅक्सीनची मदत; 'हा' देश PM मोदींचा सर्वोच्च पुरस्काराने करणार सन्मान
6
बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्यांकडून त्यांचाच प्रदेश सांभाळला जात नाही; चंद्रशेखर आझादांचे टीकास्त्र
7
'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है' या योगी-मोदींच्या घोषणेवर नवाब मलिकांचा प्रहार
8
Jio Financial च्या शेअरमध्ये जोरदार तेजी, 'या' कारणामुळे आली ६ टक्क्यांपेक्षा अधिक तेजी 
9
कांद्याचे दर कमी होणार की नाही? जाणून घ्या, भाजीपाल्यांच्या किमतीचा ताजा रिपोर्ट
10
त्रिपुरारी पौर्णिमा: ५ राशींवर हरिहर कृपा, धनलक्ष्मीचे शुभाशिर्वाद; पद-पैसा-समृद्धी वाढ!
11
बलात्कारानंतर शरीरावर ठोकले खिळे, नंतर जिवंत जाळले, मणिपूरमध्ये ३ मुलांच्या आईसोबत क्रौर्य
12
'टीम ट्रम्प'मध्ये ४ वंडर वुमेनवर मोठी जबाबदारी; कुणी चीफ ऑफ स्टाफ, तर कुणी इंटिलिजेंस...
13
यामी गौतमच्या लेकाच्या नावाची झाली चर्चा, 'वेदविद'चा अर्थ सांगत अभिनेत्री म्हणाली...
14
पुण्यात भाजपला मोठा धक्का; पाच पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम, हाती घेतली तुतारी
15
मविआतील धुसफूस उघड! उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडखोराला साथ; सुनील केदारांचा अजब दावा
16
Kartik Purnima 2024: कार्तिक पौर्णिमेला 'या' वेळेतच कार्तिकेयाचे दर्शन घ्या; आर्थिक चिंतेतून मुक्त व्हा!
17
बॉयफ्रेंडसोबत वेगळ्याच हॉटेलमध्ये सापडली मिस युनिव्हर्सची स्पर्धक; फायनलपूर्वीच काढून टाकले...
18
अधिकाऱ्यांना थप्पड मारणाऱ्या नरेश मीणाला अटक, सामरावता गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
19
F&O मध्ये Zomato, Dmart, BSE, Adani सह होणार ४५ नव्या शेअर्सची एन्ट्री, पाहा संपूर्ण लिस्ट
20
"आयुष्याच्या चौकटीत अडकलो...", सिनेमाच्या प्रमोशनवेळी अभिषेक बच्चनने व्यक्त केल्या भावना

मुदतीत देश सोडा, अन्यथा परिणाम भोगा; तालिबानने अमेरिकेला दिला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 6:05 AM

अमेरिका आणि नाटोचे सैनिक काबूल विमानतळावर बचाव मोहिमेत गुंतले आहेत. मात्र, ३१ ऑगस्टची मुदत पाळणे अतिशय कठीण झाले आहे.

काबूल : तालिबाननेअफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर अमेरिकेसमोर संपूर्ण सैन्य माघारीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. काबूल विमानतळावरील गोधळाच्या परिस्थितीमुळे अजूनही शेकडो अडकले आहेत. त्यामुळे ही मुदत पाळणे अमेरिकेसाठी अतिशय कठीण झाले आहे. त्यातच अमेरिकेने आपल्या सैनिकांना माघारी बोलाविण्यास उशीर केल्यास गंभीर परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील, अशी धमकी तालिबानने दिली आहे. 

अमेरिका आणि नाटोचे सैनिक काबूल विमानतळावर बचाव मोहिमेत गुंतले आहेत. मात्र, ३१ ऑगस्टची मुदत पाळणे अतिशय कठीण झाले आहे. बचाव मोहीम पूर्ण न झाल्यास अमेरिकेचे सैनिक ३१ ऑगस्टनंतरही अफगाणिस्तानात राहू शकतात, असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन म्हणाले होते. अमेरिकेने मुदतवाढीसाठीही तालिबानला संपर्क केला होता. मात्र, तालिबानने हीच मुदत कायम ठेवली आहे. निर्धारित मुदतीत अमेरिकेने अफगाणिस्तान सोडण्याचा इशारा दिला आहे. तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीनने सांगितले, की अमेरिकेने मुदत वाढविल्यास संबंध खराब होतील. अविश्वास निर्माण होईल.पंजशीर खोरे ताब्यात घेण्याचा तालिबानचा प्रयत्न उधळून लावल्यानंतर अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी कडक इशारा दिला आहे. अफगाणिस्तानचा तालिबानीस्तान होऊ देणार नाही, असे सालेह यांनी तालिबानला स्पष्टपणे बजावले आहे. अफगाण नागरिकांना स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी. दडपशाहीत हे शक्य नाही आणि आम्ही दडपशाही सहन करणार नाही, असे सालेह यांनी तालिबानला बजावले आहे. तालिबानने पंजशीरमधील भाग ताब्यात घेतल्याचे वृत्तही सालेह यांनी फेटाळले.

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानAmericaअमेरिका