Israeli PM Benjamin Netanyahu Warns Antonio Guterres: इस्रायल आणि लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. अशातच, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (PM Benjamin Netanyahu ) यांनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस (Antonio Guterres) यांना लेबनॉनच्या दक्षिण भागात तैनात केलेल्या संयुक्त राष्ट्र अंतरिम दलाला (UNIFIL) ताबडतोब बाहेर काढण्याचा विनंती वजा इशारा दिला आहे.
नुकताच एका व्हिडिओ निवेदनाद्वारे त्यांनी हे वक्तव्य केले आहे. नेतान्याहू म्हणाले, "मी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना आवाहन करतो की, हिजबुल्लाहच्या गडांवर आणि लढाऊ भागातून UNIFIL हटवणे आता आवश्यक आहे. मिस्टर सेक्रेटरी जनरल, युनिफिल फोर्सेसला धोक्यातून बाहेर काढा," असे नेतन्याहू म्हणाले.
आयडीएफच्या गोळीबारात दोन शांतता सैनिक जखमीअलीकडील दोन घटनांमध्ये इस्त्रायली संरक्षण दलाच्या (आयडीएफ) गोळीबारात दोन युनिफिल शांतीरक्षक जखमी झाले. शुक्रवार(11 ऑक्टोबर) रोजी UNIFIL च्या मुख्य तळ नाकोराजवळील निरीक्षण टॉवरजवळ इस्रायली हल्ल्यात दोन शांतता सैनिक जखमी झाले. याव्यतिरिक्त, इस्रायली बुलडोझरने संयुक्त राष्ट्रांच्या स्थानांजवळील अडथळेही पाडले. नेतन्याहू म्हणाले की, शांतता सैनिकांना त्यांच्या स्थानावर ठेवणे, हिजबुल्लासाठी मानवी ढाल म्हणून काम करते. यामुळे शांतता सैनिक आणि इस्रायली सैनिक, दोघांनाही धोका वाढला आहे.