मध्यपूर्वेत तणाव आणखी वाढला आहे. इस्रायल-हमास युद्धात आता अनेक देशांनी उडी घेतली आहे. लेबनॉनपासून इराणही आता युद्धाकडे वळले आहेत. दरम्यान, वाढता तणाव पाहता लेबनॉनची राजधानी बेरूतमधील अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांना उपलब्ध असलेल्या कोणत्याही तिकीटावर लवकरात लवकर लेबनॉन सोडण्यास सांगितले आहे.
चंद्र चाललाय आपल्यापासून दूर; पृथ्वीवरील दिवस हाेईल २५ तासांचा; अमेरिकेतील शास्त्रज्ञांचे नवे संशोधन
याआधी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांनीही नागिरकांना इशारा दिला होता. या भागातील परिस्थिती बिघडू शकते असं त्यांनी म्हटले होते. दरम्यान, आता अमेरिकेच्या दूतवासानेही इशारा दिला आहे. अमेरिकन दूतावासाने म्हटले आहे की, 'अनेक विमान कंपन्यांनी उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. अनेक विमानांची तिकिटेही संपली आहेत. लेबनॉन सोडण्यासाठी व्यावसायिक वाहतूक पर्याय उपलब्ध आहेत. कृपया बेरूत-राफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपलब्ध फ्लाइट पर्याय पहा. लेबनॉनहून निघू इच्छिणाऱ्या लोकांना त्यांच्यासाठी उपलब्ध असलेली कोणतीही तिकिटे बुक करा, असंही यात म्हटले आहे.
दूतावासने सांगितले की, “अमेरिकन नागरिक ज्यांना युनायटेड स्टेट्सला परतण्यासाठी पैशाची कमतरता आहे ते आर्थिक मदतीसाठी दूतावासाशी संपर्क साधू शकतात. "आम्ही शिफारस करतो की जे यूएस नागरिक लेबनॉन सोडणार नाहीत त्यांनी त्यांनी आणीबाणीच्या परिस्थिती हाताळण्यासाठी पर्याय शोधावेत'.
ब्रिटननेही दिला इशारा
याआधी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांनीही असाच इशारा दिला होता. या भागातील परिस्थिती झपाट्याने बिघडू शकते, असे लॅमी यांनी म्हटले होते. बुधवारी तेहरानमध्ये हमासचे नेते इस्माईल हनिया यांच्या हत्येनंतर इराणने इस्रायलविरुद्ध बदला घेण्याबाबत बोलले आहेत. यामुळे आता परिस्थिती आणखी चिघळणार असं सांगितलं जात आहे.
हानियाच्या मृत्यूची बातमी इस्रायलने बेरूतमध्ये हिजबुल्लाचा कमांडर फुआद शुकर मारल्याचा दावा केल्याच्या काही तासांनंतर आली आहे. रविवारी रात्री हिजबुल्लाने उत्तर इस्रायलमधील बीट हिलेल भागात अनेक रॉकेट डागले. इस्त्रायली हल्ल्यात तेथील नागरिक जखमी झाल्याचा हिजबुल्लाचा दावा आहे. इस्रायलच्या आयर्न डोम सिस्टीमने हिजबुल्लाहने डागलेली अनेक रॉकेट रोखली.