शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

३१ जानेवारीपर्यंत सत्ता सोडा, अन्यथा..., इम्रान खान यांना अल्टिमेटम

By बाळकृष्ण परब | Published: January 05, 2021 5:01 PM

Imran Khan News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची कन्या आणि पीएमएल एन च्या नेत्या मरियम नवाझ यांनी इम्रान खान यांना अल्टिमेटम दिले आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्याविरोधात सुरू असलेला राजकीय विरोध अधिकच तीव्र पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची कन्या आणि पीएमएल एन च्या नेत्या मरियम नवाझ यांनी इम्रान खान यांना दिले अल्टिमेटम इम्रान खान यांनी ३१ जानेवारीपर्यंत सन्मानाने सत्ता सोडली नाही तर अन्य निर्णय घेतला जाईल. तसेच पीडीएमच्या नेतृत्वात एक लाँग मार्च काढला जाईल

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्येइम्रान खान यांच्याविरोधात सुरू असलेला राजकीय विरोध दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे. दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची कन्या आणि पीएमएल एन च्या नेत्या मरियम नवाझ यांनी इम्रान खान यांना अल्टिमेटम दिले आहे. जर इम्रान खान यांनी ३१ जानेवारीपर्यंत सन्मानाने सत्ता सोडली नाही तर अन्य निर्णय घेतला जाईल. तसेच पीडीएमच्या नेतृत्वात एक लाँग मार्च काढला जाईल, असा इशारा मरियम नवाझ यांनी दिला आहे.मरियम नवाझ म्हणाल्या की, इम्रान खान यांनी ३१ जानेवारीपर्यंत राजीनामा दिला नाही तर विरोधी पक्षातील खासदार राजीनामा देतील. एवढेच नाही तर अन्य निर्णयही घेतले जातील. दुसरीकडे इम्रान खान यांनी आप्ला सरकारला ११ पक्षांची आघाडी असलेल्या पीडीएमपासून कुठलाही धोका नाही. सोमवारी आपल्या प्रवक्त्यांच्या बैठकीला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की, पीडीएम जवळपास हरवला आहे आणि आपोआप मरण पावला आहे. त्यामुळे त्याच्यापासून सरकारला कुठलाही धोका नाही.इम्रान खान म्हणाले की, पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंटचा मुख्य अजेंडा हा आपल्या नेत्यांसाठी नॅशनल रिकंसिलिएशन ऑर्डिनन्ससारख्या सवलती घेण्याचा होता. त्यांनी सांगितले की, पीडीएमच्या पूर्ण आंदोलनाचा हेतू हा एनआरओ मिळवण्याचा आहे. मात्र मी त्यां कुठलाही दिलासा देणार नाही.द एक्स्प्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार खान यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या साथीमुळे देण्यात आलेल्या इशाऱ्यानंतरही विरोधी आघाडी सभा घेत आहे आणि लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान विरोधी पीडीएम आघाडीचे नेते आणि इम्रान खान यांच्यातील आरोप प्रत्यारोपामुळे पाकिस्तानमधील राजकीय वातावरण तापत आहे.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानPoliticsराजकारण