शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

बलुचिस्तानचा विषय सोडा अन्यथा आम्ही खलिस्तानचा मुद्दा जिवंत करु - पाकिस्तान

By admin | Published: October 08, 2016 11:17 AM

नवाझ शरीफ सरकारने अमेरिकेत नियुक्त केलेल्या दोन विशेष राजदूतांनी भारता विरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. ८ - काश्मिर मुद्यावर अन्य देशांना पाकिस्तानची भूमिका पटवून  जास्तीत जास्त समर्थन मिळवण्यासाठी नवाझ शरीफ सरकारने अमेरिकेत नियुक्त केलेल्या दोन विशेष राजदूतांनी भारता विरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेने काश्मिरच्या विषयामध्ये हस्तक्षेप केला नाही तर, चीन-पाकिस्तान-इराण सोबत जाण्याची धमकी देणा-या या पाकिस्तानी राजदूतांनी आता खलिस्तानचा मुद्दा उपस्थित केला आहे. 
 
भारताच्या पंतप्रधानांनी बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित केला. मी त्यांना सांगू इच्छितो कि, त्यांनी आपली भूमिका बदलावी अन्यथा आम्ही खलिस्तान, नागालँड, त्रिपुरा, आसाम, सिक्कीम या भारतातील राज्यांमधील अंतर्गत बंडखोरीचा मुद्दा उपस्थित करु. आम्हाला या विषयामध्ये जायचे नाही. कारण तो दुस-या देशाच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप ठरतो असे मुशाहिद हुसैन सय्यद यांनी सांगितले. 
 
नवाझ शरीफ यांनी त्यांना काश्मिरप्रश्नी विशेष दूत म्हणून अमेरिकेत नियुक्त केले आहे. अफगाणिस्तानमध्ये शांततेचा मार्गही काश्मिरमधून जातो हे अमेरिकेने ध्यानात घ्यावे असा इशारा त्यांनी दिला.