शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

आम्हाला मोकळे सोडा, मग भारताला दाखवतो, मसुद अझरने ओकली गरळ

By admin | Published: October 13, 2016 11:23 AM

भारताविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी काश्मीरमध्ये दहशतवादी समुह वाढण्यात यावेत, यासाठी पाकिस्तानच्या सरकारने हिम्मत दाखवावी, असे सांगत त्याने पाकिस्तानी सरकारलाच चुचकारले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 13 - कुख्यात दहशतवादी आणि जैश-ए- मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरने पुन्हा भारताविरोधात गरळ ओकली आहे. भारताविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी काश्मीरमध्ये जिहादी समुह वाढण्यात यावेत, यासाठी पाकिस्तानच्या सरकारने हिम्मत दाखवावी, असे सांगत त्याने पाकिस्तानी सरकारलाच चुचकारले आहे. जैश-ए-मोहम्मदचे मॅगझिन अल-कलामद्वारे अझरने ही गरळ ओकली आहे. निर्णायक निर्णय घेण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे पाकिस्तान काश्मीरमधील ऐतिहासिक संधी गमावू शकतो, असेही त्याने म्हटले आहे. मसूद अझरच्या या मागणीमुळे भारत आणि पाकिस्तानातील संबंध आणखी ताणण्याची शक्यता आहे. 
 
काश्मीरमधील दहशतवादी हालचाली वाढवण्यासाठी पाकिस्तान सरकारने थोडेशी जरी हिम्मत दाखवली, तरी काश्मीरमधील समस्या, येथील पाण्यासंदर्भातील वाद संपुष्टात येतील, हे जमत नसेल तर, सरकारने जिहादींचे मार्ग मोकळे करावेत, अशी थेट मागणी त्याने मॅगझिनद्वारे केली आहे. असे झाल्यास 1971मधील कटू आठवणी या वर्षातील विजयामुळे पुसल्या जातील, असेही म्हणत अझरने विष पेरण्याचे काम केले आहे. अखंड भारत हे भारताचे स्वप्न आहे, मात्र जिहादी समुहांनी त्यांचे अंग-अंग जखमी केल्यामुळे अखंड भारताची त्यांची आशा अपूर्ण राहिली आहे.  तसेच, पठाणकोट आणि उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराची क्षमता किती आहे, हे उघड झाल्याचे देखील त्याने म्हटले आहे.  दरम्यान,1990 पासून चालत आलेल्या जिहादी नीतीमुळे पाकिस्तानला फायदा झाल्याचा दावाही त्याने केला आहे.  
 
आणखी बातम्या 
उरी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानावर दबाव निर्माण करत आहे. मात्र काश्मीममधील परिस्थिती पाहिली असता, पाकिस्तानने भारतावर दबाव टाकायला हवा होता, असेही त्याने पाकिस्तानी सरकारला डिवचण्याचे काम केले आहे. काश्मीर हा आपल्यासाठी जीवन मरणाचा मुद्दा असून, सार्क परिषद आणि नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधी आपण रद्द करायला हवी होती. काश्मीरमधील जिहाद आधीचा आणि नंतरच्या भारताबाबत विचार करा, तुम्हाला यात मोठा फरक जाणवेल. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय लष्कराला धक्का बसला आहे, असा कांगावाही त्याने केला आहे, असा पोकळ दावाही त्याने केला आहे.  
 
दरम्यान, भारताकडून पाकिस्तानातील दहशतवादी समुहांविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. मात्र दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यावरुन पाकिस्तानचे सरकार आणि त्यांच्या लष्करातच मतभेद असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी डॉनचे पत्रकार सायरिल अलमिडा यांनी छापली होती. याप्रकरणी त्यांच्यावर देशाबाहेर जाण्यासाठी बंदीही घालण्यात आली.