शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
2
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळविरांनी..."
3
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
4
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
5
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
6
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
7
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत
8
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
9
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
10
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
11
नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाची वर्ध्यात जोरदार तयारी
12
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
13
Kolkata Doctor Case : संदीप घोष, अभिजित मंडलच्या मोबाईलमध्ये दडली आहेत अनेक गुपितं; CBI चा मोठा दावा
14
भारतात कुठे वापरले जातात सर्वाधिक कंडोम? राज्याचं नाव जाणून थक्क व्हाल!
15
"पापा कहते हैं, "बड़ा नाम करेगा"; R Ashwin च्या वडिलांनी एन्जॉय केली लेकाची फटकेबाजी
16
‘’राहुल गांधींना जीवे मारणारी धमकी सहन करणार नाही; ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’’, नाना पटोले यांचा इशारा   
17
'बलात्कार, व्हिडीओ अन् दुसऱ्यांसोबत ठेवायला लावले संबंध'; भाजपा आमदारावर गुन्हा
18
"राहुल गांधी यांना १०० वेळा दहशतवादी म्हणेन’’, रवनीत सिंग बिट्टू यांची टीका   
19
विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण 
20
मोदींच्या पोस्टवर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया; पण काही वेळातच पोस्ट केली डिलीट, कारण...

लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 7:50 PM

Lebanon Pager Blast: लेबनान पेजर ब्लास्ट के बाद हिजबुल्लाह ने इजरायल के खिलाफ पहली बार सीमा पार हमलों को अंजाम दिया है.

Lebanon Pager Blast : लेबनॉन पेजर ब्लास्टनंतर हिजबुल्लाहने इस्रायलविरुद्धयुद्धाची घोषणा केली आहे. हिजबुल्लाहने बुधवारी (18 सप्टेंबर) इस्त्रायली सीमा चौक्यांवर शेकडो रॉकेट डागले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाहने पहिल्यांदाच इस्रायलवर सीमापार हल्ले केले आहेत. दरम्यान, लेबनॉन पेजर ब्लास्टमध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3,000 हून अधिक लोक जखमी आहेत. तर, सीरियामध्येही 7 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढू शकतो. 

काल म्हणजेच मंगळवारी (17 सप्टेंबर) लेबनॉनमध्ये साखळी पेजर स्फोट झाले. पेजर हे एक वायरलेस टेलिकम्युनिकेशन डिव्हाईस आहे, जे व्हॉइस आणि टेक्स्ट्स मेसेज पाठवण्यासाठी वापरले जाते. या स्फोटाचे तार इस्रायलशी जोडले जात आहे. या हल्ल्यात इस्रायलचा हात असल्याचा आरोप हिजबुल्लाने केला आहे. मात्र, इस्रायलच्या लष्कराने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

हिजबुल्लाह सैनिक पेजर का वापरतात?हिजबुल्ला संघटनेत संवादासाठी पेजर वापरते. मोबाईलमुळे लोकेशन सापडू शकते, त्यामुळे सैनिक संवादासाठी पेजर वापरतात. दरम्यान, हे पेजर कसे फाडले गेले. याबाबत हिजबुल्लाने अद्याप काहीच माहिती दिलेली नाही. लिथियम बॅटरी जास्त गरम होऊन स्फोट झाल्यामुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज आहे. पण, तज्ञांनी या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने पेजर गरम होऊन फुटणे अशक्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

प्रत्येक पेजरमध्ये 3 ग्रॅम गनपावडर होतेदरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये वेगळेच कारण दिले जात आहे. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने 5000 पेजर्समध्ये स्फोटके पेरल्याचा दावा केला जातोय. मोसादने प्रत्येक पेजरमध्ये 3 ग्रॅम स्फोटक पेरले होते. आता खरे कारण काय, हे लवकरच समोर येईल. मात्र, या हल्ल्यानंतर इस्रायल आणि हिजबुल्लाह पुन्हा आमने सामने आले आहेत. इस्रायलनेही सीमेवर आपले सैन्य वाढवले असून, युद्धासाठी अलर्ट राहण्यास सांगितले आहे.

टॅग्स :Israelइस्रायलwarयुद्धInternationalआंतरराष्ट्रीय