वॉशिंग्टन : भारत सरकारने भारतात ‘लीगो इंटरफेरोमीटर’ लावण्यासाठी तत्त्वत: मंजुरी दिली असली तरीही २०२३ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होणे तांत्रिकदृष्ट्या व्यावहारिक आहे, असे अमेरिकेच्या एका ज्येष्ठ वैज्ञानिकाने म्हटले आहे.लीगो हॅनफोर्ड आब्झर्व्हेटरी आणि लीगो इंडियासाठी लीगो लॅबोरेटरीचे संपर्क अधिकारी फ्रेड राब म्हणाले की, २०२३ च्या अखेरपर्यंत लीगो इंडियाचे आॅनलाईन होणे तांत्रिकदृष्ट्या व्यावहारिक आहे. लेजर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटिशनल व्हेव (गुरुत्वीय लहरी) आॅब्झर्व्हेटरी (लीगो)च्या वैज्ञानिकांनी आपल्या भारतीय सहकाऱ्यांसोबत काम करण्यासाठी भारतात डझनभर दौरे केले आहेत. ज्या महत्त्वाच्या तीन संस्थांवर लीगो इंडियाच्या स्थापनेची आणि संचालनाची प्राथमिक जबाबदारी आहे, त्यांच्याशी संबंधित हे सहकारी आहेत. इन्स्टिट्यूट आॅफ प्लाज्मा रिसर्च, गांधीनगर इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स, पुणे आणि राजा रामन्ना सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड् टेक्नालॉजी, इंदूर या त्या तीन संस्था आहेत.फ्रेडराब म्हणाले की, आम्ही सर्वांनी मिळून प्रष्ठिानासाठी एका शानदार जागेची निवड केली आहे.
२०२३ पर्यंत ‘लीगो इंडिया’ सुरू होणार
By admin | Published: February 21, 2016 12:53 AM