शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

माणुसकीला काळीमा! फोटोसाठी छाव्याचे केले असे हाल; अवस्था पाहून डोळ्यात येईल पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 1:10 PM

समुद्र किनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांना फोटो काढता यावेत यासाठी एका सिंहाच्या छाव्याचे पाय तोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मॉस्को - केरळमधील गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला. अननसातून फटाके खायला देऊन केरळमधील मल्लापूरम भागातील रहिवाशांनी या हत्तीणीची हत्या केल्याचा संशय आहे. सोशल मीडियावर या घटनेनंतर संतापाची लाट उसळली. अशातच प्राण्यांचा छळ केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. समुद्र किनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांना फोटो काढता यावेत यासाठी एका सिंहाच्या छाव्याचे पाय तोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रशियामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली असून तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. काही आठवड्यांचाच हा छावा असून त्याचा जन्म झाल्यानंतर त्याला त्याच्या आईपासून दूर करण्यात आले. पर्यटक छाव्यासोबत फोटो काढत असताना तो धावू नये यासाठी त्याचे पाय तोडल्याचा भयंकर आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. 

डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, सिंबा नावाच्या या छाव्याची प्रकृती ढासळत चालली होती. दोन्ही पायांना गंभीर इजा झाल्यामुळे त्याला उठता येत नाही. छाव्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या युलिया अगिवा यांनी सिंबाच्या मणक्याला गंभीर जखम झाली असून आणि त्याला अनेक दिवस उपाशी ठेवण्यात आले असल्याची माहिती दिली. अनेकदा वन्य प्राण्यांची हाडे मोडली जातात. जेणेकरून हे पर्यटकांना पाहून पळून जाता कामा नये. 

प्राण्यांच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची प्रकृती सुधारण्यासाठी प्रयत्न  केले जात आहेत. मात्र अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रपती पुतीन यांना इकॉलॉजिस्टसोबत झालेल्या बैठकीत या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : अरे व्वा! तब्बल 18 दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या बाळाने जिंकली कोरोनाची लढाई

पाकिस्तानातील गाढवांची संख्या वाढली; 'या' देशासाठी फायदेशीर ठरली

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; धडकी भरवणारी आकडेवारी

CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय! 'ही' दोन लक्षणं असल्यास वेळीच व्हा सावध; नाहीतर...

Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू

टॅग्स :russiaरशियाAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार