संयुक्त राष्ट्र : चपलख शब्दावलीसाठी ओळखल्या जाणा:या पंतप्रधान मोदी यांनी युनोच्या आमसभेतील भाषणातही या उपजत कौशल्याचा प्रत्यय दिला. जी-5, जी-2क् आणि अशा अन्य नामावलीऐवजी ‘जी-ऑल’ अशा नवा शब्दप्रयोग करून अवघे जगच एक होण्याची गरज विदित केली.
कोणताही एखादा देश किंवा देशांची संघटना जगरहाटी ठरवू शकणार नाही. अशा संघटनांची नावे वेळोवेळी बदलत असतात. भारतही अशा अनेक संघटनांचा सदस्य आहे. आज गरज आहे ती या सर्व संघटनांनी विविध ध्येयाच्या पूर्ततेसाठी आणि जगाच्या पाठीवरील जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी एकजुटीने काम करण्याची.
आंतरराष्ट्रीय योग दिवस
आंतरराष्ट्रीय योग दिवस ठरवून तो साजरा करू या, असे आवाहनही त्यांनी जागतिक नेत्यांना केले. योग म्हणजे प्राचीन परंपरेने दिलेली मौल्यवान भेट होय. हा व्यायाम नाही. योगामुळे मानवाचा निसर्गाशी एकात्मभाव निर्माण होतो. जीवनशैलीत बदल करून चैतन्य येते. योग हवामानातील बदलामुळे निर्माण झालेल्या संकंटाला तोंड देण्यासही पूरक होऊ शकतो.सुरक्षा परिषदेत 21 व्या शतकाचे वास्तव प्रतिबिंबित असावे, असे सांगत त्यांनी 2क्15 र्पयत संयुक्त राष्ट्रांच्या 15 सदस्यांच्या शक्तिशाली सुरक्षा परिषदेचा चेहरा-मोहरा बदलण्याचे आवाहनही केले. सुरक्षा परिषदेसह संयुक्त राष्ट्रात बदल करून ही संस्था अधिक लोकशाहीभिमुख आणि समावेशक करावी, असे त्यांनी सांगितले.
वाजपेयींचे अनुकरण
माजी पंतप्रधान अटल बिहारी
वाजपेयी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हिंदीत भाषण केले होते. त्याचेच
अनुकरण मोदी यांनी केले. वाजपेयी
1998 ते 2क्क्4 र्पयत पंतप्रधान होते. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हिंदीतून भाषण करणारे वाजपेयी हे पहिले पंतप्रधान ठरले. संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत भाषेमध्ये हिंदी भाषेचा समावेश नाही.
भारतविरोधात घोषणा
नरेंद्र मोदी यांचे समर्थक आणि
काश्मिरी फुटीरवाद्यांचे काही प्रतिनिधी
यांच्यात संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाबाहेर शाब्दिक चकमक उडाली. मोदी यांच्या स्वागतासाठी मोठय़ा प्रमाणावर भारतीय-अमेरिकन जमले होते. ते घोषणा देत असताना फुटीरवाद्यांचे गटही भारताच्या विरोधात घोषणा देत होते.
भाषणाचे कौतुक
नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत शनिवारी केलेल्या पहिल्याच भाषणाचे भारतीय अमेरिकनांनी कौतुक केले आणि भारत जगाच्या व्यासपीठावर आत्मविश्वासाचा आवाज घेऊन उभा ठाकला असे म्हटले. मोठय़ा संख्येने भारतीय-अमेरिकन नागरिक अभ्यागतांच्या सज्जत भाषण ऐकण्यासाठी आले होते. युनोच्या इमारतीभोवती अभूतपूर्व असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.