न्यूयॉर्क : फॉर्च्यून ५०० कंपनींच्या ५० हून अधिक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत (सीईओ) रात्री सहभोजन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात व्यवसायाचे मार्ग खुले असल्याचा पुनरुच्चार केला. फॉर्च्यून नियतकालिकातर्फे आयोजित या रात्रभोजनात अमेरिकेतील ५0 हून अधिक मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी झाले होते. भारत दोन्ही हातांनी तुमचे (मुख्य कार्यकारी अधिकारी) स्वागत करण्यास तयार असून जगातील या सर्वात मोठ्या लोकशाही देशात येऊन गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. फॉर्च्यूनचे संपादक अॅलन मरे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. या मेजवानीत लॉकहीड मार्टिनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी मर्लिन ह्यूसन, फोर्डचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी मार्क फील्ड्स, आयबीएमचे अध्यक्ष गिनी रोमेटी, पेप्सीच्या प्रमुख इंदिरा नुयी आणि डाव केमिकलचे अध्यक्ष अॅण्ड्य्रू लिवेरीस सहभागी झाले होते. .........................मोदी सर्वोत्तम नेते : मरडॉकन्यूयॉर्क : अमेरिका भेटीमध्ये विविध कंपन्यांच्या सीईओंबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगप्रसिद्ध माध्यमतज्ज्ञ व उद्योजक रूपर्ट मरडॉक यांनीही भेट घेतली. पंतप्रधानांची सुमारे तासभर भेट घेतल्यानंतर मरडॉक यांनी नरेंद्र मोदी यांची भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा सर्वोत्तम नेता अशा शब्दांमध्ये प्रशंसा केली आहे.पंतप्रधानांच्या भेटीनंतर मरडॉक यांनी टष्ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मोदी यांच्याबरोबर व्यतीत केलेला तासभर अत्यंत चांगला गेला असे त्यांनी टष्ट्वीट केले आहे; परंतु या कौतुकाबरोबर नरेंद्र मोदी यांच्यासमोर भारतासारख्या गुंतागुंतीच्या देशातील समस्या सोडविण्याचे आव्हानही आहे असे त्यांनी नमूद केले आहे. ‘भारतात वेगाने डिजिटलीकरण व्हावे’न्यूयॉर्क : भारत मोठी बाजारपेठ असल्याचे सांगत अमेरिकेतील प्रसार माध्यमांतील बड्या नेत्यांनी फोर जीच्या लवकर विस्तारासह भारतीय व्यवस्थेचे गतीने डिजिटलीकरण व्हावे, असे आवाहन केले. हे आवाहन अमेरिकन प्रसारमाध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या पहिल्या बैठकीत केले, असे निवेदनात म्हटले आहे. ...................ओबामा - मोदीचर्चेत संरक्षण, वित्त केंद्रस्थानीन्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी होणारी भेट ही दोन देशांतील आर्थिक संबंध आणि आशियासह जगात राजकीय व संरक्षण सहकार्याला पुढे नेईल, असे व्हाईट हाऊसने म्हटले.अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बेन ऱ्होडस् यांनी गुरुवारी ही माहिती येथे दिली. ते म्हणाले, यावर्षी नवी दिल्लीत ओबामा आणि मोदी यांच्या झालेल्या भेटीतील मुद्यांवर ही चर्चा आणखी पुढे जाईल. हवामान बदलावर पॅरिसमध्ये होणाऱ्या बैठकीत त्या प्रश्नाकडे कसे बघायचे यासाठी हे दोन नेते त्यांच्या विचारांची देवाणघेवाण करतील. मोदी यांच्याशी होणारी भेट ही खूप महत्त्वाची आहे. कारण भारत ही खूप मोठी बाजारपेठ आहे.तत्पूर्वी, भारताचे अमेरिकेतील राजदूत अरुण के. सिंह म्हणाले की, मोदी आणि ओबामा यांच्या भेटीत द्विपक्षीय, विभागीय आणि जागतिक प्रश्नांवर चर्चा होईल. मोदी पंतप्रधान झाल्यापासून उभय नेत्यांमध्ये होत असलेली ही तिसरी भेट आहे. ................मोदींनी घेतला मोदक, खांडवीचा आनंदन्यूयॉर्क : अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी न्यूयॉर्कमध्ये उत्तम पदार्थ तयार करून विकास खन्ना यांनी त्यांची शाबासकी मिळविली.पंतप्रधानांनी न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेतील ५० कंपन्यांच्या सीईओंच्या समवेत घेतलेल्या भोजनातील पदार्थ विकासने तयार केले होते. पोहे, खांडवी, मोदक, थंडाई, खजूर, डेझर्टस्, पोंगल, भिसिबेळे अन्ना आणि सरबते अशा ३० हून अधिक पदार्थांचा यात समावेश होता. पंतप्रधानांनी या भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर विकास खन्नांची पाठ थोपटून, ‘तूने मेरा सर ऊंचा किया’ अशा शब्दांमध्ये त्यांचे कौतुक केले. (वृत्तसंस्था)
गुंतवणुकीचे दोन्ही हातांनी स्वागत करू
By admin | Published: September 25, 2015 11:42 PM