काहिरा : आफ्रिकन देश लिबियामध्ये त्सुनामीसारखा पाऊस आल्याने हाहाकार उडाला आहे. येथे मृतांची संख्या २० हजारांपेक्षा अधिक होण्याची भीती लिबियाच्या महापौरांनी व्यक्त केली आहे. या महापुरात संपूर्ण कुटुंबे वाहून गेली आहेत.
६,९०० जणांचा मृत्यू देशात आतापर्यंत झाला असून, ही आकडेवारी सतत वाढत आहे. २० हजारपेक्षा अधिक जण बेपत्ता आहेत. उसामा अल हुसादी नावाच्या एका वाहनचालकाने सांगितले की, तो पत्नी आणि ५ मुलांना ४ दिवसांपासून शोधतोय. मात्र अजून ते नेमके कुठे आहेत याचा तपास लागलेला नाही.
२०,०००+ बेपत्ता३०,००० लोक बेघर लिबिया महापुरानंतर १० हजार लोकसंख्येचे शहर डेर्नाजवळ २ धरणे फुटली आहेत. यामुळे शहर पूर्णपणे भुईसपाट झाले.
या देशांकडून मदत : तुर्की, इटली, कतार, यूएई, इजिप्त, जॉर्डन, ट्युनिशिया, कुवेत, संयुक्त राष्ट्र, युरोपियन युनियन, अमेरिका
कुजलेल्या मृतदेहांमुळे रोगराईचा उद्रेक?उद्ध्वस्त झालेल्या डेर्ना शहरात पाण्याखाली आणि ढिगाऱ्याखाली मृतदेहांचा शोध घेतला जात आहे. मात्र मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळत आहेत. यामुळे प्राणघातक रोगांचा उद्रेक होण्याची भीती आहे.
शहरात आल्या २० फुटांपेक्षा जास्त उंच लाटा...महापुरामुळे डेर्ना शहरात २० फुटांपेक्षा जास्त उंच लाटा उसळल्या होत्या. शोध पथके अनेकांचा शोध घेत आहेत. मात्र मृतदेह सापडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा दुपटीने वाढू शकतो. वादळ आणि पुराचा प्रचंड वेग यामुळे आम्ही संकटाचा सामना करू शकलो नाही. - अब्लेल मोनीम अल घैथी, महापौर