कैरो : गेल्यावर्षीच्या घातक निदर्शनांप्रकरणी इजिप्तमधील एका न्यायालयाने मुस्लिम ब्रदरहूडचा सर्वोच्च मार्गदर्शक मोहंमद बादेई याच्यासह इतर 37 जणांना शनिवारी जन्मठेप ठोठावली. लष्कराने मोहंमद मुर्सी सरकार उलथवून टाकल्यानंतर ही निदर्शने करण्यात आली होती.
घातक निदर्शनांमध्ये दोषी ठरलेल्या बादेईला अन्य 2 प्रकरणांत यापूर्वीच मृत्युदंड ठोठावण्यात आलेला आहे. गतवर्षी निदर्शने करून हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप असलेल्या 48 जणांपैकी 37 जणांना दोषी ठरविण्यात आले असून त्यात बादेई याचा समावेश आहे. या सर्वाना जन्मठेप सुनावण्यात आली असून मुस्लिम ब्रदरहूडसाठी हा एक मोठा धक्का आहे. बादेई याच्याखेरीज जन्मठेप ठोठावण्यात आलेल्यांमध्ये मोहंमद अल- बेल्टागी आणि ओसामा यासीन या प्रमुख ब्रदरहूड नेत्यांचा समावेश आहे.
च्मुर्सीच्या निष्ठावानांना सामूहिकरीत्या शिक्षा ठोठावली जाण्याची ही काही पहिली वेळ नाही. गेल्या मार्चमध्ये मिन्या गुन्हेगारी न्यायालयाने मुस्लिम ब्रदरहूडच्या 529 पाठीराख्यांना मृत्युदंड ठोठावला होता. गेल्या ऑगस्टपासून मुर्सीच्या हजारो समर्थकांना अटक करण्यात आलेली आहे.
च्मुर्सी यांच्या गच्छंतीपासून सुरक्षा दलांवरील दहशतवादी हल्ल्यांत वाढ झाली असून यात 5क्क् अधिकारी व सैनिक मृत्युमुखी पडले आहेत.
च्मुर्सी सरकार उलथल्यानंतर झालेल्या निदर्शनांदरम्यान हिंसाचार आणि हत्येत आरोपींचा सहभाग होता, असे न्यायाधीशांनी सांगितले.