देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जिनेव्हा येथून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. जिनिव्हा येथे भारतीय समुदायाच्या नागरिकांसोबत संवाद साधताना जयशंकर म्हणाले, "काही लोकांचे म्हणणे आहे की, आम्ही चीनकडून एवढी आयात का करत आहोत? 1960, 70, 80 आणि 90 च्या दशकात देशातील सरकारांनी मॅन्युफॅक्चरिंगकडे दुर्लक्ष केले. आता लोक यावर उपाय शोधू इच्छित आहेत. लोक म्हणाले की, आपण अक्षम आहोत यामुळे प्रयत्न करू नये. सशक्त मॅन्युफॅक्चरिंगशिवाय, आपण जगातील मुख्य शक्ती कसे होऊ शकतो? यासाठी कठोर परिश्रम आणि चांगल्या धोरणांची गरज आहे. 'आयुष्य खटाखट नाही, आयुष्य म्हणजे कठोर परिश्रम'. हा माझा तुम्हाला संदेश आहे, आम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील."
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे रविवारी तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. ते 8 ते 13 सप्टेंबरदरम्यान सोदी अरेबिया, जर्मनी आणि स्वित्झरलँड दौर्यावर आहेत. ते रविवारी रियाद येते पोहोचले आणि तेथे पहिल्या भारत-खाडी सहयोग परिषदेत (जीसीसी) परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला. दरम्यान त्यांनी जीसीसी सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत बैठक केली.
यासंदर्भात, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे, भारत आणि GCC यांच्यात राजकीय, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा सहकार्य, सांस्कृतिक आणि सामान्य लोकांतील संबंधांसह अनेक क्षेत्रांत धृड आणि बहुआयामी संबंध आहेत. GCC प्रदेश भारतासाठी एक प्रमुख व्यापारी भागीदार म्हणून उदयास आला आहे. येथे सुमारे 89 लाख भारतीय प्रवासी राहतात. परराष्ट्र मंत्र्यांची बैठक भारत आणि GCC यांच्यातील विविध क्षेत्रात संस्थात्मक सहकार्याची समीक्षा आणि ते व्यापक करण्याची एक संधी असेल.