ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 13- सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली लिंक्डइन ही साइट मायक्रोसॉफ्ट खरेदी करणार आहे. जगभरातल्या व्यावसायिकांसाठी संपर्काची सर्वात मोठी साइट म्हणून लिंक्डइन परिचित आहे. मायक्रोसॉफ्ट ही साइट 26.6 बिलियन डॉलरला खरेदी करणार आहे. 26.6 बिलियन डॉलरची भारतीय रुपयामध्ये किंमत 1,78,485 कोटी रुपये एवढी होती.
शुक्रवारी लिंक्डइन साइडच्या शेअर्सची किंमत 196 डॉलर इतकी होती. शेअर मार्केटच्या सुरुवातीलाच लिंक्डइनच्या शेअर्सनी 48 टक्क्यांपर्यंत उसळी घेतली होती. मात्र त्याच वेळी मायक्रोसॉफ्टचे शेअर्स 3.3 टक्क्यांनी पडले होते. लिंक्डइनला आज पुन्हा संस्थापक प्राप्त झाला आहे, असं वक्तव्य लिंक्डइन या साइटचे चेअरमेन रेड हॉफन यांनी म्हटलं आहे.
लिंक्डइन खरेदी करण्यासंदर्भात रिड आणि जेफशी ब-याच काळापासून बोलत होतो, असंही यावेळी नाडेला यांनी सांगितलं आहे. खरेदीसंदर्भातला करार 2016मध्ये होणार असल्याचं कंपन्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे. लिंक्डइन ही साइट मायक्रोसॉफ्टच्या उत्पादकता आणि व्यावसायिक प्रक्रियेचा भाग होणार असल्याची माहिती सत्या नाडेला यांनी दिली आहे.