बीजिंग : चीनमधील लिंकशुअर या नेटवर्क कंपनीने संपूर्ण जगाला मोफत वायफाय देण्याची तयारी सुरू केली असून, त्यासाठी या कंपनीने चीनच्या जिनक्वान या उपग्रह स्थानकातून पहिला उपग्रह अंतराळात पाठवायचे ठरविले आहे. पुढील दोन वर्षांत १० उपग्रह पाठवण्यात येतील आणि २०२६ पर्यंत कंपनीचे २७२ उपग्रह अंतराळात असतील. त्यामुळे जगभर मोफत वायफाय मिळू शकेल.लिंकशुअरचे कार्यकारी प्रमुख वाँग जिंगयिंग यांनी सांगितले की, या योजनेची तयारी पूर्ण झाली असून, ती यशस्वी होण्यासाठी आम्ही ३ हजार कोटी रुपये खर्च करणार आहोत. अर्थात या उपग्रहांद्वारे मोफत वायफाय सेवा सर्वांना मिळणार असली तरी भविष्यात या गुंतवणुकीतून मोठा फायदाही मिळू शकेल.
लिंकशुअर कंपनीची जगभर मोफत वायफायची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 4:52 AM