वॉशिंग्टन : दहशतवादाचे प्रायोजकत्व करणाऱ्या देशांच्या अमेरिकेने केलेल्या यादीत पाकिस्तान १९९३-१९९४ दरम्यान जवळपास समाविष्ट झाला होता, असे अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएच्या अधिकाऱ्याने म्हटले. सीआयएचे माजी अधिकारी रॉबर्ट एल. ग्रेनियर म्हणाले की, बिल क्लिंटन प्रशासनाच्या प्रारंभी १९९३ आणि १९९४ मध्ये मी परराष्ट्र (राजकीय कामकाज) खात्याच्या अंडर सेके्रेटरींचा विशेष सहायक होतो व सीआयएकडून मला ‘उसणे’ घेण्यात आले होते. दहशतवादाचा दरवर्षी अत्यंत बारकाईने आढावा घेण्याचे काम मी करीत असे. दहशतवादाचे प्रायोजकत्व करणाऱ्यांच्या यादीमध्ये पाकिस्तानचा जवळपास समावेश झाला होता, असे ग्रेनियर यांनी गुरुवारी येथे म्हटले. (वृत्तसंस्था)>भारत-पाक तणावातून ‘घटना’ बघायची इच्छा नाही सुरक्षेच्या प्रश्नावरून निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांनी संवाद साधावा, असे आवाहन अमेरिकेने केले आहे. उभय देशांतील तणाव नियंत्रणाबाहेर जाऊन काही घटना बघण्याची आमची इच्छा नाही. आम्ही या दोन देशांत संबंध बळकट व्हावेत यालाच प्रोत्साहन देतो. त्या भागातील सुरक्षेबद्दल वाटणारी काळजी लक्षात घेता तणाव कमी करण्यासाठी त्यांनी काम व चर्चा केली हे तर स्पष्टच आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे उप प्रवक्ते मार्क टोनर गुरुवारी म्हणाले.
‘त्या’ यादीत पाक जाणार होता
By admin | Published: September 10, 2016 5:29 AM