ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २४ - मतदान संपल्यानंतर इंग्लंडमधील लिव्ह कॅम्पचा उत्साह मावळू लागला आहे. लिव्ह कॅम्पच्या प्रमुख नेत्यांनी पराभवाची शक्यता व्यक्त केली आहे.
यूके इंडिपेंडन्स पक्षाचे प्रमुख आणि युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याची जोरदार मागणी करणारे नीजेल फारएज यांनी आपण विजयी होऊ असे वाटत नसल्याचे स्काय न्यूजशी बोलताना म्हटले आहे. जोरदार प्रचारामुळे मतदार मोठया संख्येने मतदानाला उतरले. रिमेन बाजी मारतील असे वाटते असे फारएज यांनी सांगितले.
मतदानानंतर यू गव्हने रिमेन म्हणजे युरोपियन युनियनच्या समर्थक बाजूला ५२ तर, विरोधक म्हणजे लिव्ह साइडला ४८ टक्के मते मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. अटीतटीचा सामना असला तरी, रिमेन निसटता विजय मिळवतील असा अंदाज आहे.