शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

LIVE: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष

By admin | Published: November 09, 2016 6:59 AM

अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली आहे. सर्व अंदाज चुकवत डोनाल्ड ट्रम्प यांनी 276 मतसंघ मते मिळवून हिलरींचा दारुण पराभव केला.

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 9 - जागतिक महासत्ता म्हणून बिरुदावली मिरवणाऱ्या अमेरिकच्या राष्ट्राध्यक्षपदी सर्वांना धक्का देत डोनाल्ड ट्रम्प निवडून येण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांना मागे टाकत आघाडी घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प 238 मतसंघ मतांसह आघाडीवर असून हिलरी क्लिंटन यांच्याकडे 215 मतं आहेत. सुरुवातीपासूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतली असून हिलरींना आघाडी घेण्याची संधीही दिली नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतल्याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. 
 
(कशी होते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड ?)
(US ELECTION - हिलरी की ट्रम्प?)
(US ELECTION - प्रत्यक्ष मतदानाआधीच अमेरिकेत विक्रमी मतदान)
 
कोट्यवधी अमेरिकी नागरिकांनी ४५वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी मंगळवारी मतदान केले. डेमोक्रॅटिक पार्टीच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अटीतटीची लढत आहे. संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीचा निकाल काय लागतो याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. लोकशाहीची जननी असलेल्या अमेरिकेत प्रचाराची पातळी यंदा प्रथमच न भुतो एवढ्या खालच्या पातळीला घसरली होती. 
 
(अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक आणि भारत)
 
देशाचा ४५ वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी शेकडो काँग्रेस सदस्य, प्रांतिक विधानसभांचे सदस्य, स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांशिवाय जवळपास २० कोटी लोक पात्र मतदार आहेत. अमेरिकी निवडणूक प्रणालीच्या आधीच मतदान करण्याच्या तरतुदीचा वापर करीत विक्रमी ४ कोटी २० लाख लोकांनी आधीच मतदान केले आहे. २०१२ मध्ये ३.२३ कोटी लोकांनी मतदानाच्या दिवसापूर्वीच मतदान केले होते. 
LIVE UPDATES: 
 
- पेन्सिल्व्हेनियामध्ये डोनाल्ड ट्रम्प विजयी.
- हिलरी क्लिंटन यांचा नेवाडात विजय.
नवी दिल्ली - अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतल्याने हिंदू सेना कार्यकर्त्याचा जल्लोष.
- अरिजोना येथील हॉटेलमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी सेलिब्रेशन करण्यास केली सुरुवात.
 
- डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर असून जिंकणार असं निश्चित झाल्याचं चित्र, ट्रम्प 238 मतसंघ मतांसह आघाडीवर, हिलरी यांना 209 मतसंघ मतं.
- अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक - फ्लोरिडामध्ये डोनाल्ड ट्रम्प विजयी.
- डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल, 216 मतसंघ मतांसह ट्रम्प आघाडीवर, हिलरी क्लिंटन यांच्याकडे 197 मतसंघ मतं.
- वॉशिंग्टनमध्ये हिलरी क्लिंटन विजयी, लोवा आणि उताह येथे डोनाल्ड ट्रम्प विजयी.
 
- हिलरी - डोनाल्ड ट्रम्प वादात जॉर्ज बुश तटस्थ
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी सहपत्नी मतदान केलं. मात्र त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन किंवा रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यापैकी कोणालाही पसंती न दाखवता तटस्थ भुमिका घेतली आहे. 
 
 - ट्रम्प यांनी आघाडी घेतल्याने मेक्सिको चलनात ऐतिहासिक घसरण
अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवर जगाचं लक्ष असून रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार यांनी आघाडी घेतल्याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर दिसत आहे.आंतरराष्ट्रीय शेअरबाजार कोसळले असून मेक्सिको चलन पेसोमध्ये घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत पेसो ऐतिहासिक घसरणीवर आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीपासून हिलरी क्लिंटन यांना कडवी झुंज दिली असून आघाडी घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प सध्या 197 मतसंघ मतांसोबत आघाडीवर असून हिलरी क्लिंटन 131 मतसंघ मतं मिळाली आहे.  विजयासाठी 270 मतसंघ मतांची गरज आहे. लोकप्रिय मतांमध्येही डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत.  क्लिंटन यांना 46 तर डोनाल्ड ट्रम्प यांना 49 टक्के लोकप्रिय मते मिळाली आहेत.
 
- हिलरी क्लिंटन यांना 47 तर डोनाल्ड ट्रम्प यांना 49 टक्के लोकप्रिय मते.
- डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतल्याचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम, आंतरराष्ट्रीय शेअरबाजार कोसळले.
- हिलरी क्लिंटन कनेक्टिकटमध्ये तर ट्रम्प लुझियानात जिंकण्याची शक्यता - सीएनएन.
- डोनाल्ड ट्रम्प मोन्टाना येथे जिंकण्याची शक्यता - सीएनएन.
- न्यू मेक्सिकोमध्ये हिलरी तर मिसौरी येथे ट्रम्प जिंकण्याची शक्यता - सीएनएन.
- डोनाल्ड ट्रम्प 129-27 ने आघाडीवर, विजयासाठी 207 मतसंघ मतांची गरज.
- डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीने केलं मतदान 
- मिसिसिपी येथे डोनाल्ड ट्रम्प विजयी
- नॉर्थ डाकोटा, साऊथ डाकोटा, योमिग, कन्सास, टेक्सास येथे ट्रम्प तर न्यूयॉर्कमध्ये क्लिंटन जिंकण्याची शक्यता.
- 8 मतसंघ मत मिळवून लुझियानात ट्रम्प विजयी.
- हिलरी क्लिंटन यांनी 97-84 ने आघाडी घेत डोनाल्ड ट्रम्प यांना टाकलं मागे.
- फ्लोरिडा, ओहिओ आणि नॉर्थ कॅरोलिनामध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर.
- मार्को रुबिओ यांनी फ्लोरिडामध्ये सेनेट जिंकली, रिपब्लिकनने राखली जागा.
- डोनाल्ड ट्रम्प यांच्या महिलांसंबंधी आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे 71 टक्के मतदान चिंताग्रस्त - एक्जिट पोल.
- इलिनॉयस, न्यू जर्सी, मॅसच्युसेट्स, मेरिलँड, डेलावेर, -होड आयलंड आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियात हिलरी क्लिंटन यांचा विजय.
- डोनाल्ड ट्रम्प वेस्ट व्हर्जिनियात विजयी.
- कॅलीफोर्नियामधील अझुला येथे मतदान केंद्रावर फायरिंग, एकाचा मृत्यू तर 3 जखमी झाल्याची माहिती.
- मतसंघ मतांमध्ये हिलरी क्लिंटन यांना मागे टाकत डोनाल्ड ट्रम्प 68-48 ने आघाडीवर. 270 जणांचा पाठिंबा मिळवणारा उमेदवार राष्ट्राध्यक्षपदी निवडला जाईल.
- मतसंघ मतांमध्ये हिलरी क्लिंटन यांना मागे टाकत 19-3 ने डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर.
- केंटकी आणि इंडियानामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय तर व्हरमाँट येथे हिलरींना मिळाला विजय - सीएनएन.