London : 15 वर्षाचा एका मुलगा नदीत स्वीमिंग करण्यासाठी गेला होता. आंघोळ करताना त्याचा पाय घसरला. त्याचा पायाखाली एका गन आली होती. यानंतर त्याच्यासोबत गेलेल्या दुसऱ्या मुलांनीही आजूबाजूला शोध घेतला तर त्यांच्या हाती अनेक शस्त्र लागलेत. नदीच्या पाण्यात त्यांच्या हाती एक मशीन गनही लागली. त्यानंतर पोलिसांनी नदीतील शस्त्रांचा खजिनात बाहेर काढला.
ही घटना ब्रिटनच्या लंडनमधील आहे. इथे उष्णतेच्या लाटेमुळे 15 वर्षाचा जेम्स व्हाइट आपल्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत नदीत आंघोळ करण्यासाठी गेला होता. पण आंघोळ करण्यादरम्यान त्याला नदीत अनेक शस्त्रे सापडलीत. जे बघून तो हैराण झाला.
'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, नदीत उतरलेल्या जेम्स पाय अचानक घसरला होता. जेव्हा त्याने खाली पाहिलं तर त्याला दिसलं की, त्याला पाय एका गन आणि तिच्या मॅगझिनवर पडला आहे. त्याने त्याच्या मित्रांना याबाबत सांगितलं आणि आणखी शोध घेतला. यानंतर त्यांना पाण्यात एकापाठी एक 11 बंदुकी सापडल्या.
सांगण्यात आलं की, या शस्त्रांमध्ये सबमशीन गनसोबतच मॅगझिन आणि गोळा-बारूदही सापडलं. ही सगळी शस्त्रे बघून जेम्ससोबतच सगळेच हैराण झाले. त्यांना काही समजलं नाही. जेम्स म्हणाला की, ही ट्रिप त्याच्यासाठी एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हती. त्यांना जराही अंदाज नव्हता की, त्यांना आंघोळ करताना नदीत इतकी शस्त्र सापडतील.
जेम्ससोबत तिथे असलेल्या 32 वर्षीय रयानने सांगितलं की, आम्ही या नदीच्या किनारी नेहमीच येतो. इतर लोकही इथे येत जात असतात. पण त्यांना कधी काही सापडलं नाही. शस्त्रे सापडल्यावर त्यांनी लगेच पोलिसांना फोन केला.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शस्त्रे ताब्यात घेतली आणि घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. असं सांगितलं जात आहे की, नदीत पाणी कमी आहे. त्यामुळे एका भागातील पाणी काढून परिसराची व्यवस्थित पाहणी केली जाईल.