शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

‘जबाबासाठी लंडनला या’

By admin | Published: July 21, 2016 5:17 AM

मला काहीच दडवून ठेवायचे नाही. पण भारत सरकार दुष्ट हेतूने माझा पिच्छा पुरवत असल्याने मला तेथे जाणे शक्य नाही.

लंडन : मला काहीच दडवून ठेवायचे नाही. पण भारत सरकार दुष्ट हेतूने माझा पिच्छा पुरवत असल्याने मला तेथे जाणे शक्य नाही. त्यामुळे भारतीय तपासी यंत्रणांना माझे काही जाब-जबाब घ्यायचे असतील तर त्यांनी इथे लंडनमध्ये यावे किंवा ई-मेलने प्रश्न पाठवावेत, असा भन्नाट सल्ला वादग्रस्त उद्योगपती विजय मल्ल्या यांनी दिला आहे.मल्या म्हणाले, ‘माझ्या बाबतीत जे काही सुरु आहे त्याचे वर्णन मी ‘पिच्छा पुरविणे’ याखेरीज अन्य प्रकारे करू शकत नाही. (पण) काहीही करून मला यातून निभावून बाहेर पडावेच लागेल. मल्ल्या म्हणाले, ‘माझ्या किंगफिशर एअरलाइन्सचे अनेक अधिकारी भारत सरकारला चौकशीसाठी (तेथे) उपलब्ध आहेत. शिवाय कंपनीची हजारो कागदपत्रेही मिळविणे त्यांना शक्य आहे. या उपरही त्यांना खुद्द मला काही विचारायाचे असेल तर त्यांनी इथे लंडनमध्ये येऊन मला विचारावे, रेडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून माझ्याशी बोलावे अथवा ई-मेलने प्रश्न पाठवावेत व मी त्याला उत्तरे देईन. मला काहीच दडवून ठेवायचे नाही. ’मल्ल्या पुढे असेही म्हणाले, ‘पण केवळ मी जातीने भारतात हजर नाही एवढ्यावररूनच माझ्याविरुद्ध अटक वॉरन्ट काढून माझा पासपोर्ट रद्द केला जावा हे मला जरा विरोधाभासी व चिंताजनक वाटते. यावरून त्यांच्या हेतूविषयी (ते स्वच्छ असल्याविषयी) मला कशी बरं खात्री वाटावी?’हा अनुभव आपल्याला नवीन नाही व यापूर्वी ही आपण हे सर्व सहन केले आहे, असे सांगताना मल्ल्या म्हणाले, तपासी अधिकाऱ्यांचा पहिला (कटु) अनुभव मला १९८५ मध्ये आला. मोठ्या तयारीनिशी दोन वर्षे ते माझ्याकडे येत राहिले व शेवटी त्यांना काहीही सापडले नाही व मी पूर्णपणे निर्दोष ठरलो. वाईट याचे वाटते की, भारतात तपासी यंत्रणा या राजकारण्याच्या हातातील खेळणे आहेत. (वृत्तसंस्था)>डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द केलामोटार शर्यतीच्या ‘फॉम्युला १’ स्पर्धेत उतरणाऱ्या ‘फोर्स इंडिया’ या संघाचे मालक असलेल्या मल्ल्या यांनी याच क्रीडाप्रकाराशी संबंधित ‘आॅटोस्पोर्ट’ या नियतकालिकास मुलाखत देताना वरीलप्रमाणे सल्ला देताना म्हटले की, भारत सरकारने माझा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द केलेला असल्याने मला भारतात जाणे अशक्य आहे.