लंडन: पंजाब नॅशनल बँकेच्या सुमारे १३ हजार कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या नीरव मोदीचे भारतातील प्रत्यार्पण रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण भारताकडे होणाऱ्या प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरोधात अपील करण्यास लंडन हायकोर्टाने परवानगी दिली आहे. नीरव मोदी हा मोठा दिलासा मानला जात आहे. (london high court gave nod to pnb scam accused nirav modi to appeal against extradition to india)
लंडन हायकोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये जस्टीस मार्टिन शेम्बर्लेन यांनी सांगितले की, नीरव मोदीची मानसिक स्थिती ढासळली आहे. या परिस्थितीत आत्महत्या करू शकतात, आपले म्हणणे कोणी ऐकेल की नाही, अशी भीती नीरव मोदीला वाटत आहे. मात्र, वैद्यकीय बाबीवर कोर्ट प्रत्यार्पणविरोधात अपील करण्यास परवानगी देत आहे, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
आता बुलेट ट्रेनने अयोध्येला जाता येणार; दिल्ली-वाराणसी मार्गावर १२ स्थानके निश्चित!
प्रत्यार्पणाला मॅजिस्ट्रेट कोर्टाची मंजुरी
काही आठवड्यांपूर्वी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला मॅजिस्ट्रेट कोर्टाने मंजुरी दिली होती. मात्र, या निर्णयाविरोधात नीरव मोदीने लंडन हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यावर नुकताच सुनावणी झाली. ज्यात हायकोर्टाने नीरव मोदीला प्रत्यार्पणाविरोधात अपील करण्यास परवानगी दिली आहे. नीरव मोदीला भारतात कधी आणणार याची उत्सुकता सर्वांना विशेषतः बँकांना लागली होती. मात्र प्रत्यार्पणाला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे.
केवळ लसींचे दोन डोस नाही, तर मुंबई लोकल प्रवासासाठी ‘या’ अटीही पूर्ण कराव्या लागणार!
दरम्यान, नीरव मोदीला भारताच्या सुपूर्द करण्याचा निर्णय २५ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्हा न्यायालयाने दिला होता. या निर्णयावर ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला १५ एप्रिल २०२१ शिक्कामोर्तब केले होते. भारतात आणल्यानंतर नीरव मोदीला मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. ऑर्थर रोड तुरुंगात एक विशेष सेल तयार ठेवण्यात आला आहे. मोदीला बराक क्रमांक १२ मध्ये असलेल्या तीनपैकी एका सेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. ऑर्थर रोड तुरुंगातील बराक क्रमांक १२ हा अतिसुरक्षित समजला जातो.