डिमेंशियाने पीडित एका महिलेबाबत ब्रिटनच्या एका कोर्टाने निर्णय दिला आहे की, महिला शारीरिक संबंध तर ठेवू शकते, पण लग्न करू शकत नाही. डिमेंशिया असा आजार आहे ज्यात व्यक्तीची निर्णय घेण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती कमजोर झालेली असते.
कोर्टाने ब्रिटनच्या ज्या महिलेबाबत हा निर्णय दिला आहे त्या महिलेचं वय ६९ वर्षे आहे. ही महिला एका होम केअरमध्ये राहते आणि तिथेच राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत महिलेची जवळीकता वाढली आहे.
ब्रिटीश टेलीग्राफच्या रिपोर्टनुसार, लंडनमधील हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणाले की, या महिलेची मानसिक क्षमता अशी नाही की, ती लग्नाचा निर्णय घेऊ शकेल. न्यायाधीश म्हणाले की, महिला सेक्शुअल रिलेशनबाबत निर्णय घेऊ शकते.
कोर्टाने असंही सांगितलं की, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की, या केसवर उपाय शोधण्यासाठी उशीर झाल्याने महिलेला तिच्या पार्टनरसोबत इंटिमेट होता आलं नाही. ब्रिटनच्या सोशल सर्व्हिस कॉउन्सिलने महिलेसंबंधी निर्णयाबाबत कोर्टाकडे मागणी केली होती.
कोर्टाने सांगितले की, महिलेकडे केस, घर, देखभाल, आर्थिक उलाढाल, संपत्ती आणि लग्नासंबंधी निर्णय घेण्याची क्षमता नाहीय. महिला या गोष्टीचा अंदाज लावू शकत नाहीये की, घटस्फोटाच्या स्थितीत पैसे आणि प्रॉपर्टीचं काय होईल.