शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

"लंडन मराठी संमेलन 2017"ची जय्यत तयारी

By admin | Published: May 18, 2017 2:33 PM

लंडन हे फक्त लंडनकरांचं कधीच नव्हतं, लंडन हे नेहमीच सर्वांचं होतं आणि म्हणूनच हे आज ग्लोबल शहर म्हणून ओळखलं जात.

- लंडन हे फक्त लंडनकरांचं कधीच नव्हतं, लंडन हे नेहमीच सर्वांचं होतं आणि म्हणूनच हे आज ग्लोबल शहर म्हणून ओळखलं जात.  अशा ह्या ग्लोबल शहरामध्ये आपल्या सर्वांसाठी ह्या वर्षी घेऊन येत आहोत एक दिमाखदार, धमाकेदार, सर्वसमावेशक "लंडन मराठी संमेलन" . महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ८५व्या वर्धापनवर्षा निमित्त लंडन मराठी संमेलन २०१७ (LMS) हे साजरं करण्यात येत आहे. LMS हे सर्व दूर पसरलेल्या महाराष्ट्रीयांना एकत्र आणण्याचा एक मोठा पुढाकार आहे.  हा पुढे चालून जागतिक स्तरावर मिळालेल्या महाराष्ट्रीय लोकांचे यश, सिद्धी आणि भरभराट साजरा करण्याचं आणि प्रशंसा करण्याचं एक भव्य व्यासपीठ सिद्ध होणार आहे जेणे करून भारताबाहेर स्थित असलेल्या येणाऱ्या पिढीला आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या भाषेचा अभिमान असेल.  
 
महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ८५व्या वर्धापन वर्षाच्या निमित्ताने साजरा होणारा LMS हा महाराष्ट्राच्या उद्योजकतेचा, संस्कृतीचा आणि मराठी बाण्याचा एक अद्भुत जल्लोष असणार आहे. LMS हे सर्व महाराष्ट्रीयांना आपल्यात दडलेलं कौशल्य, संगीत, कला आणि सर्जनशीलता सादर करण्याचं एक भव्य व्यासपीठ देणार आहे. ह्या संमेलनात विश्व स्तरावर उद्योजकतेमुळे यश मिळवलेल्या मराठी लोकांचा सत्कार करण्यात येणार आहे. यानिमित्तानं पहिल्यांदाच या शहरात "Global Marathi Entrepreneur Summit" भरणार आहे. या उद्योगिक परिषदेत उपस्थित राहण्यासाठी खालील लिंकवर जाऊन बुकिंग करावी - https://www.lms2017.org.uk/lms-business-summit/
 
ही परिषद प्रतिष्ठित अशा १, ""Canada Square,  Canary Wharf""च्या ३९व्या मजल्यावर थाटात आयोजित होणार आहे. ज्याच्यामध्ये भारताबरोबरच ब्रिटनमधील मंत्री आणि इतर प्रतिष्ठित उद्योजक उपस्तिथ असणार आहेत. ब्रिटनमध्ये बदललेल्या राजकीय सूत्रांमुळे इथे उद्योग करण्यासाठी बरेच मार्ग उघडले आहेत, ज्याचा फायदा महाराष्ट्रीय उद्योजकांना नक्कीच मिळेल. "मराठी"  म्हटलं की गणपती, भारूड, नाटक, लावणी, शिट्ट्या, पोहे, ढोल, ताशे, आशा, लता, सचिन जसे सहजपणे बोलून जातो त्याच सहजतेने "यशस्वी उद्योजक" देखील म्हणता आलं पाहिजे !, असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. 
 
उद्योजकते बरोबरच या संमेलनामध्ये Exclusive Cruise on River Thames असणार आहे. महाराष्ट्रीयन लोकांनी आपल्या बुद्धिमत्तेने, कल्पकतेने आणि परिश्रमाने उभे केलेले आपापले साम्राज्य ऐश्वर्यात साजरे करण्याची आणि अनुभवायची  ही एक विलक्षण संधी आहे. ही cruise थेम्स नदीवरची सगळ्यात मोठी cruise असल्या कारणाने तिच्या जाण्यासाठी आणि येण्यासाठी अतिशय प्रसिद्ध असलेलं Tower Bridge हे खास आपल्यासाठी उघडणार आहे, एकदा नव्हे पण दोनदा ! याची तिकीट देखील खालील लिंकरती उपलब्ध आहेत 
https://www.lms2017.org.uk/schedule-of-events/
 
अर्थातच या सर्व गोष्टींबरोबरच नंतर दोन दिवसांमध्ये भरगच्च करमणुकीचे कार्यक्रमदेखील पाहायला मिळणार आहेत.  यात संगीत असेल, विनोदी कार्यक्रम असतील आणि अर्थातच रुचकर आणि स्वादिष्ट मराठी जेवणाची मेजवानी असणर आहे. याच बरोबर वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेल्या २-३ दिग्गजांसोबत मनमोकळ्या गप्पादेखील करण्यात येणार आहोत. 
 
पहिले जागतिक मराठी उद्योजकांचे अधिवेशन हे २ जून रोजी होणार आहे. यावेळी दुबई, अमेरिका, यूके, भारत आणि इतर देशातून उद्योजक येतील.  ३ आणि ४ जूनला एक मोठा सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये यूके, यूरोप आणि इतर देशातून जवळजवळ १३०० लोकं येणे अपेक्षित आहे.  LMSच्या अनुषंगाने वेग वेगळे उपक्रम आयोजित केले आहेत, ज्यामुळे मुक्कामाबरोबर सहवासदेखील आनंदाचा होईल, असे आयोजकांचे म्हणणे आहे.  
 
""आमचं आणि आपलं हे समाजावर एक ऋण आहे, असं आम्ही समजतो आणि ते आम्ही वेळोवेळी फेडण्याचा प्रयत्न करतो. मग ते उद्योजकतेतून उद्भवणाऱ्या नौकऱ्या असू देत किंवा सामाजिक कार्य असू दे.  असाच एक उपक्रम आहे आणि तो म्हणजे अस्थिमज्जा देणगीचा (bone marrow donation)"", असे "महाराष्ट्र मंडळ लंडन"नं प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे. 
आशिया खंडातील रहिवाशांमध्ये अस्थिमज्जा दाता नोंदणीपुस्तकात केवळ ५ पैकी एकानंच  नोंदणी केली आहे.  
 
हेच प्रमाण परदेशी लोकांमध्ये ५पैकी ४ असे आहे.  याचा अर्थ जीवघेण्या काही रोगांवर योग्य तो उपचार केल्यानंतर संपूर्णतः बरा होण्याचं प्रमाण आशियाई लोकांमध्ये केवळ २० टक्के आहे. LMSच्या माध्यमातून आम्ही कमीत कमी १००१ दाता नोंदणीखात्यावर नोंदणीकृत करण्याचा चंग बांधला आहे जेणे करून अस्थिमज्जेच्या अभावामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण बऱ्याच अंशाने कमी होईल अशी आमची आशा आहे.  
 
 
LMS हा उपक्रम सर्वांना एकत्र आणण्याबरोबरच आपल्यातली प्रतिभा दाखविणे, कलेद्वारे उत्साह व आनंद निर्माण करणे व एकंदरीतच आयुष्याचा खरा आनंद घेणे हा होय. ३ आणि ४ जून च्या सांस्कृतिक सोहोळ्यात मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत सयाजी शिंदे आणि मोहन आगाशे यांच्याशी.  त्याच बरोबर आर्या आंबेकर, ऋषिकेश रानडे, नुपूर दैठणकर, नंदेश उमप, समीर चौगुले, प्राजक्ता हनमगर, भार्गवी चिरमुले, सिद्धार्थ कदम आणि सत्यजित प्रभू हे सर्व जण त्यांच्या मोहक गाण्यांनी, नाचांनी आणि कलेने सर्व दर्शकांना खिळवून ठेवणार आहेत. याच बरोबर अत्यंत प्रतिभावान स्थानिक कलाकार देखील आपली कला सादर करणार आहेत.  यांच्यात प्रामुख्याने नमूद करण्याजोगे म्हणजे पद्मश्री प्रताप पवार यांचा भारावून सोडणार कथक या भारतीय नृत्याचा मनमोहक नजराणा आपल्याला बघावयास मिळणार आहे. कोणतंही मराठी संमेलन हे नाटकाशिवाय पूर्ण होत नसतं.  म्हणून एक हलकं फुलकं पारिवारिक नाटक "ह्या गोजिरवाण्या घरात" हे ह्या लंडन मराठी संमेलनामध्ये सादर होणार आहे. 
 
LMS – एक संधी
मराठी संस्कृतीचा पेटारा पुन्हा एकदा उलगडायची, जन्मभूमीची जाणीव ह्या मातीत रुजवायची
मराठी माणसांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्याची यशस्वी कलाकारांच्या कलेचे बेधुंद रंग लंडन मध्ये उधळायची यशाचे बाळकडू दिग्गजांकडून शिकण्याची येणाऱ्या पिढी ला “मी मराठी” असल्याचा अभिमान बाळगण्याची …
 
1.25 अब्ज लोकांमधून परदेशी स्थित झालेल्यांनी आणि मायदेशीदेखील स्थित झालेल्यांनी मिळवलेल्या यशाचंहे सेलिब्रेशनआहे.  आपल्या व्यावसायिकतेचं, आपल्या उद्योजकतेचं, आपल्या बौद्धिकतेचं आणि आपल्या गुणवत्तेचं हे सेलिब्रेशन आहे. सर्व अडी अडचणींवर मात करून यशस्वी झालेल्या आपल्या सर्वांचे हे सेलिब्रेशन  आहे. 
तर २०१७ ह्या ऐतिहासिक वर्षा मध्ये २,३ आणि ४ जून ला साजरा होणाऱ्या ह्या लंडन मराठी संमेलनामध्ये उपस्तिथ राहण्यासाठी, तिकीट विकत घेण्यासाठी आणि अधिक माहिती साठी lms2017.org.uk या संकेतस्थळाला भेट द्या.