वॉशिंग्टन : मिल्की वे ही आपली आकाशगंगा तयार होत असताना नव्याने उदय झालेल्या ताऱ्यांच्या वाढदिवसाची पार्टी सुरू होती. पण त्यात आपला सूर्य नव्हता, कारण त्याचा जन्म ताऱ्यांच्या जगात तसा थोड्या उशिरानेच झाला. मिल्की वे आकाशगंगेतील ताऱ्यांचे विस्तृत सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यानुसार सूर्याचे सृजन पाच अब्ज वर्षापूर्वीही झाले नव्हते. अंतराळ शास्त्रज्ञांच्या मते मिल्की वे आकाशगंगेत १० अब्ज वर्षापूर्वी ताऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर सृजन होत होते. तो काळ बेबी बूमचा होता. ५ अब्ज वर्षापूर्वीही सूर्याचा मात्र उदयही झाला नव्हता. म्हणूनच शास्त्रज्ञ म्हणतात , आमच्या सूर्याचा जन्म थोडा उशिरानेच झाला. सूर्याचा जन्म झाला तेव्हा मिल्की वे आकाशगंगेतील ताऱ्यांच्या सृजनाचा वेग मंदावला होता. पण असे असले तरीही सूर्याचा जन्म उशिरा झाल्याने सौरमालिकेतील ग्रहांच्या विकासाला चालना मिळाली असावी. ताऱ्यांचे सृजन झाल्यानंतर हैड्रोजन व हिलीयम मोठ्या प्रमाणावर राहिले होते. कारण मोठ्या , वजनदार ताऱ्यांचा जीवनकाल लवकर संपला. त्यामुळे तारांगणात सौरमालेतील ग्रहाना वपृथ्वीला आवश्यक असे घटक मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले. (वृत्तसंस्था)
सूर्याचा जन्म उशिरा होणे ठरले फायद्याचे
By admin | Published: April 11, 2015 1:01 AM