इंचेओन : दक्षिण कोरियामधील समुद्रात बुडालेल्या जहाजाने बुडण्यापूर्वीच्या १३ महिन्यांत केलेल्या फेर्यांपैकी २४६ फेर्यांत म्हणजे जवळपास प्रत्येक फेरीतच माल वाहण्याच्या क्षमतेचे उल्लंघन केले असल्याचे एका दस्तावेजातून उघड झाले आहे. अखेरच्या प्रवासातही हे जहाज क्षमतेहून अधिक प्रवाशांना वाहून नेत असावे. शेकडो प्रवाशांना असुरक्षित जहाजाद्वारे प्रवास करण्याची मुभा देऊन नियामकांनी घोडचूक केली असल्याचे या दस्तावेजात अधोरेखित करण्यात आले आहे. एक खाजगी प्रतिष्ठान जहाजावरील मालाचे वजन करते तर दुसरे एक प्रतिष्ठान वजनाची र्मयादा ठरवते. ही दोन्ही प्रतिष्ठाने सागरी वाहतूक सुरक्षा यंत्रणेचा भाग असली, तरी त्यांचा परस्परांसोबत कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नसल्याचे उघड झाले. (वृत्तसंस्था)
बुडालेले सेवोल जहाज नेहमी असे ‘ओव्हरलोड’
By admin | Published: May 05, 2014 2:56 PM