लाहोर : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात प्रेमविवाह करणा:या तरुणीचा तिच्या पतीसह शिरच्छेद करण्यात आला. खोटय़ा प्रतिष्ठेसाठी (ऑनर किलिंग) हत्येची ही अमानुष घटना शुक्रवारी झाली, असे पोलिसांनी सांगितले.
लाहोरपासून 1क्क् कि. मी.वरील सतरा गावची रहिवासी असलेल्या मुआफिया (23) या तरुणीचे नजीकच्या हसनाबाद गावातील सज्जाद अहमद (वय 27) या युवकाशी प्रेम जुळले होते. या दोघांनी गेल्या 18 जून रोजी प्रेमविवाह केला होता.
मुआफियाच्या कुटुंबियांनी त्यांचा प्रेमविवाहाचा प्रस्ताव ठोकरल्यानंतर दोघांनी न्यायालयात विवाह केला होता. हे दोघे हसनाबादला परतले असल्याचे मुलीच्या कुटुंबियांना कळले. त्यानंतर मुआफियाच्या कुटुंबातील सात जणांनी सज्जादच्या घरावर हल्ला केला व दोघांना गावच्या मुख्य चौकात नेऊन तेथे सर्वासमक्ष त्यांचा शिरच्छेद केला. हत्येनंतर संशयित आरोपी फरार झाले. यात मुआफियाचा जन्मदाता दिलशाद याचाही समावेश आहे. संशयितांना पकडण्यासाठी आम्ही धाडी टाकत आहोत, असे पोलीस उपअधीक्षक राणा जाहिद हुसैन यांनी सांगितले. आम्ही घटना घडत असताना घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांचेही जबाब घेत आहोत, असे ते म्हणाले. पाकमध्ये अलीकडेच ऑनर किलिंगच्या दोन घटना घडल्या होत्या. (वृत्तसंस्था)