आपण रातोरात श्रीमंत व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. एकदा तरी लॉटरी लागावी अशी सर्वांचीच इच्छा असते. पण तुम्हाला जर कोणी ट्रकमधील डिझेल कमी होणं आणि लॉटरी लागण्याचा काही संबंध आहे असं सांगितलं. तर तुमचा विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. अशीच एक हटके घटना घडली आहे. तब्बल 8 कोटींची लॉटरी जिंकणाऱ्या महिलेने हा संबंध जोडला असून ट्रकमधील डिझेल कमी झाल्यानेच आपल्याला लॉटरी लागल्याचं सांगितलं आहे.
अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये राहणाऱ्या लॉरा किन या ख्रिसमससाठी प्रियकरासोबत ट्रकने शॉपिंगला गेल्या होत्या. यावेळी ट्रकमधील इंधन संपत असल्याची सूचना देणारी लाईट पेटू लागली. यानंतर लॉरा यांनी नॉर्थ कॅरोलियामधील सेव्हन इलेव्हन पेट्रोल पंपावर ट्रक थांबवला. त्यांनी ट्रकमध्ये डिझेल भरलं. पंपावर डिझेल भरत असताना लॉरा यांनी तिथे लॉटरीचं तिकीट काढलं. यानंतर अवघ्या काही मिनिटांत लॉरा यांना लॉटरी लागली.
लॉरा यांनी तब्बल आठ कोटीपेक्षा अधिक रक्कम जिंकली आहे. लॉटरी लागल्याचं समजताच लॉरा यांना प्रचंड आनंद झाला. आपल्याला लॉटरी लागली आहे, यावर त्यांना बराच वेळ विश्वासच बसला नाही. त्या आनंदाच्या भरात मोठमोठ्याने ओरडू लागल्या. ज्या परिस्थितीत लॉटरी लागली त्याबद्दल लॉरा यांना सर्वाधिक आश्चर्य वाटलं.
ट्रकमधील इंधन त्या दिवशी संपल्याचा सिग्नल पेटलाच नसता तर मी लॉटरीचं तिकिट खरेदीच केलं नसतं. त्यामुळे जुळून आलेल्या योगायोगानं चकित झाल्याचं लॉरा यांनी सांगितलं. नॉर्थ कॅरोलिनामध्ये वास्तव्यास असलेल्या मार्सिया फिने यांनीदेखील काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे लॉटरी जिंकली होती. मार्सिया एका दुकानात चिप्स खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्यांनी दुकानातून 2 हजार रुपयांचं लॉटरीचं तिकिट खरेदी केलं. त्यामुळे त्यांना 57 लाख रुपयांची लॉटरी लागली.
पत्नी ठरली लकी, टॅक्सी ड्रायव्हर झाला करोडपती; मिळाले 2 कोटी 80 लाख
टॅक्सी ड्रायव्हरचं नशीब रातोरात बदलल्याची घटना समोर आली आहे. एका झटक्यात तो करोडपती झाला आहे. लॉटरी लागली असून त्याने तब्बल 2 कोटी 80 लाख रुपये जिंकले आहेत. टॅक्सी ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार, तो कोट्यधीश झाला मात्र त्यामागे त्याच्या दिवंगत पत्नीचा मोठा वाटा आहे. त्याने पत्नीच्या वयाच्या नंबरचा उपयोग करून लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. टॅक्सी ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. लॉटरी घेताना त्याने पत्नीच्या वयाच्या नंबरचा वापर करून लॉटरीची दोन तिकीटं खरेदी केली. दोन्ही तिकीट एकाच नंबरचे होते. नशिबाने त्याला लॉटरी लागली आणि त्याने तब्बल 12 मिलियन Bath म्हणजेच दोन कोटी 80 लाख रुपये जिंकले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"