शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

भाग्यवान दाम्पत्य; मृत्यूही त्यांची फारकत करू शकला नाही!

By admin | Published: August 11, 2016 1:15 AM

तब्बल ६३ वर्षांच्या वैवाहिक जीवनात सावलीप्रमाणे परस्परांच्या सोबत राहिलेल्या एका अमेरिकी दाम्पत्याची मृत्यूही फारकत करू शकला नाही!

शिकागो : तब्बल ६३ वर्षांच्या वैवाहिक जीवनात सावलीप्रमाणे परस्परांच्या सोबत राहिलेल्या एका अमेरिकी दाम्पत्याची मृत्यूही फारकत करू शकला नाही! वयाची ८५ वर्षे पार केलेल्या या दाम्पत्यामधील पती आणि पत्नी या दोघांनीही काही दिवसांपूर्वी एकाच खोलीत काही मिनिटांच्या अंतराने या जगाचा अत्यंत शांतपणे निरोप घेतला.हेन्री डे लँगे व जेनेट अशी या जोडप्याची नावे. हेन्री हे कोरियात युद्ध लढलेले अमेरिकी लष्करातील माजी सैनिक तर जेनेट संगीतकार. या दोघांचे सन १९५३ मध्ये लग्न झाले. अमेरिकेच्या डाकोटा राज्यातील प्लेट येथे ते पाच मुले व नातवंडांसह राहायचे.८७ वर्षांच्या जेनेट अल्झायमरच्या रुग्ण होत्या व सेवा-सुश्रुषेसाठी सन २०११ पासून त्यांना दक्षिण डाकोटामधील एका सुश्रुषागृहात ठेवण्यात आले होते. तिचे पती हेन्री कधी दिवसातून एकदा, कधी दोनदा व तर कधी तिनदाही तिला भेटायला जायचे. पण ८६ वर्षांच्या हेन्री यांचा पौरुषग्रंथीचा कर्करोग बळावल्यानंतर त्यांनाही त्याच सुश्रुषागृहात ठेवण्यात आले व हेन्री आणि जेनेट तेथे एकाच खोलीत असायचे.गेल्या रविवारी सुश्रुषागृहातील त्याच खोलीत सा. ५.१० वाजता आधी जेनेट यांचे व त्यानंतर अवघ्या २० मिनिटांनी हेन्री यांचे निधन झाले, असे त्यांचा एक मुलगा ली डे लँगे याने सांगितले.त्या दिवशी सर्व कुटुंबिय सुश्रुषागृहाच्या त्या खोलीत एकत्र जमले होते. रविवार असल्याने सर्वांनी बायबलचे एकत्र पठण सुरु केले. ते पसालम १०३ हे प्रकरण वाचत होते. हे वाचन सुरु असतानाच हातात बायबल घेतलेल्या अवस्थेत जेनटचे अत्यंत शांतपणे प्राणोत्क्रमण झाले.ली डे लँगे यांनी सीएनएनशी संलग्न केएसएफवाय या स्थानिक वृत्तवाहिनीस सांगितले की, आई गेल्याचे लक्षात आल्यावर माझ्या धाकट्या भावाने उठून बाजूला खुर्चीत बसलेल्या वडिलांना आई स्वर्गवासी झाल्याचे सांगितले. आता तुम्हाला तिच्याशी भांडण्यासाठी स्वर्गातच जावे लागेल,असेही तो वडिलांना थट्टेने म्हणाला.हेन्रीने जणू नेमके तेच केले. त्यांनी जेनेटला एकदा डोळेभरून पाहून घेतले आणि तिच्यानंतर बरोबर २० व्या मिनिटाला ते स्वत:ही स्वर्गाच्या वाटेवर रवाना झाले.ली यांनी त्यावेळी घडलेला आणखीही एक विचित्र योगायोग सांगितला. त्यांच्या सांगण्यानुसार हेन्री गेले तेव्हा त्याने खोलीतील भिंतीवरील घड्याळ पाहिले आणि आश्चर्य म्हणजे घड्याळयाचे काटे त्याच क्षणाला थबकले होते.बॅटरीवर चालणारे ते घडयाळ हेन्री यांच्या मृत्यूसमयीच नेमके का थांबावे, याचे कोडे कुटुंबियांना उलगडले नाही. कदाचित मृत्यूसाठी तीच योग्य वेळ असल्याचा तो परमेश्वरी संकेत असावा, अशी त्यांची भावना झाली.