दुबई - सर्वांत उंच इमारत ‘बुर्ज खलिफा’ असो वा सर्वांत खोलीवर असलेला स्वीमिंग पूल असो, आधुनिक स्थापत्य कलेतील हे आविष्कार घडणाऱ्या दुबईच्या आकाशात आता आलिशान तरंगते रिसॉर्ट उभारले जात आहे. जमिनीपासून १०० मीटर उंचीवर ही रचना उभारल्यावर दुबई ‘थर्मे दुबई आयलँडस् इन द स्काय’साठी ओळखली जाईल.
दुबईत थर्मे ग्रुपचा हा प्रकल्प उभारला गेल्यावर या बेटाची ओळखच बदलेल. येथील रॉयल पॅलेसच्या शेजारी जबील पार्क भागात हा प्रकल्प उभारला जाईल. या प्रकल्पाच्या रचनेचे डीलर स्कोफिडिओ आणि रेनफ्रो हे शिल्पकार आहेत. २०२६ मध्ये याचे काम सुरू होऊन २०२८ मध्ये तो जगभरातील लोकांच्या स्वागतासाठी सज्ज असेल.
संगीत, कला आणि प्रदर्शनेही
रिसॉर्टच्या या रचनेत केवळ पर्यटकांच्या निवासाचाच विचार न करता मनोरंजनासह कलेच्या जपणुकीचाही विचार करण्यात आला आहे. येथे संगीत-कलेच्या सादरीकरणासह इतर अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतील.
आकाशात सुंदर धबधबे
वाळवंटातील ‘ओयासिस’ अशा धर्तीवर या प्रकल्पाची सध्या आखणी सुरू आहे. ५ लाख स्वेअर फूट इतक्या भव्य क्षेत्रात हा प्रकल्प असेल. या रिसॉर्टमध्ये सुंदर फुलांनी नटलेल्या बागा असतील, आकर्षक धबधबे पर्यटकांना वेड लावतील. एवढेच नव्हे, तर थंडी असो अथवा उन्हाळा, विविध मोसमातील हवामानानुसार येथील तापमान असेल.
या असतील सुविधाएक थर्मल पूल असेल.हिरवळीने नटलेल्या गॅलरी.हवामानानुसार पर्यटकांना सुविधा.रात्री विविध मनोरंजन कार्यक्रम.