केवळ कोरोना व्हायरसची महामारीच नाही तर जगात काही असेही देश आहेत जिथे उपसमार आणि दुष्काळामुळे लोकांचा जीव धोक्यात आला आहे. संयुक्त राष्ट्र खाद्य एजन्सीद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, आफ्रिकन देश मेडागास्करमध्ये दुष्काळामुळे हजारो लोकांचा जीव धोक्यात आहे. येथील लोक आपलं पोट भरण्यासाठी पाला-पाचोळा, गवत, कीटक खात आहेत.
गेल्या आठड्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार, मेडागास्करमध्ये लोक जंगलातील झाडांचा पाला, टोळ खावे खावे लागत आहेत. इथे धुळीच्या वादळांमुळे आणि दुष्काळामुळे शेतातील पिके नष्ट झाली आहेत. जगण्यासाठी येथील लोक काहीही खायला तयार आहेत. संयुक्त राष्ट्राचे विश्व खाद्य कार्यक्रमाचे सीनिअर डायरेक्टर आमेर दाऊदी यांनी याबाबत इशारा दिला.
आमेर दाऊदी म्हणाले की, 'जर आपण या समस्येवर तोडगा शोधू शकलो नाही, जर आपण दक्षिण मेडागास्करमधील लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करू शकलो नाही तर अनेक परिवार उपाशी राहतील. अनेक लोक जीव गमावतील. येथील लोक पोट भरण्यासाठी कॅक्टसचे कच्चे फळही खात आहेत.
मेडागास्करच्या दक्षिणी भागात फार वाईट परिस्थिती आहे. आमेर दाऊदी यांच्यानुसार त्यांनी जगात अशी स्थिती कधीही पाहिली नाही. त्यांच्याकडे खाण्यासाठी काहीच नाही.