शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
4
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
5
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
6
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
9
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
10
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
11
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
12
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
13
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
14
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
15
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
16
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
17
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
18
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
19
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
20
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला

राजकन्येचा मांत्रिक प्रियकर अन‌् ‘छा-छू’गिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 9:19 AM

राजघराण्यातल्या लोकांचा थाट आणि त्यांचा मानपान किती असतो ते आपल्याला माहीत आहे.

राजघराण्यातल्या लोकांचा थाट आणि त्यांचा मानपान किती असतो ते आपल्याला माहीत आहे. ब्रिटिश राजघराण्यातील महाराणी एलिझाबेथपासून तर प्रिन्स विल्यमपर्यंत राजघराण्यातील प्रत्येक व्यक्ती किती लोकप्रिय असते, आहे आणि जगभरात त्यांचं नाव सातत्यानं किती चर्चेत असतं तेही आपण अनुभवलं आहे. अर्थात लोकप्रियता आणि प्रसिद्धीच्या बाबतीत ब्रिटिश राजघराणं कायमच जगभरात अव्वल क्रमांकावर असलं, तरी इतर राजघराण्यांच्या बाबतीतही त्यांच्या त्यांच्या देशांत त्यांचा मान सर्वोच्च असतो. लोक त्यांच्याकडे कायम आपला ‘मालक’ किंवा ‘तारणहार’ या दृष्टीनंच पाहात असतात; पण ज्यांना राजघराण्याच्या सत्तेतून पायउतार केलं जातं किंवा जे स्वत:हून राजघराण्याच्या गादीवर लत्ताप्रहार करतात, त्यांना तेवढ्यापुरती प्रसिद्धी मिळाली तरी इतर साऱ्या मानमरातबापासून त्यांना नंतर आयुष्यभर दूरच राहावं लागतं.

राजघराण्यातली लोकांकडे जनता नेहमीच आदरानं पाहात असते, त्यामुळे त्यांच्याकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षाही असतात. त्यांनी कसं वागावं, कसं राहावं याबद्दलचे लोकांचे आडाखे ठरलेले असतात. राजघराण्यातील व्यक्तींनी त्यांच्या परंपरा तोडल्या किंवा स्वत:चा, राजघराण्याच्या प्रतिष्ठेचा आब राखला नाही, तर जनतेकडूनही त्यांना मोठी टीका सोसावी लागते. सध्या या यादीत अग्रस्थानी आहे नॉर्वेची राजकन्या प्रिन्सेस मार्था लुईस. तिला सध्या आपल्याच देशातील लोकांच्या टीकेचं धनी व्हावं लागतं आहे. प्रिन्सेस मार्था लुईस ही नॉर्वेचे राजा हेरॉल्ड पाचवे यांची ज्येष्ठ कन्या. राजा हेरॉल्ड यांच्यानंतर मार्था हीच नॉर्वेच्या राजघराण्याची प्रमुख वारसदार आणि महाराणी मानली जात होती. कारण एकतर राजाची ती ज्येष्ठ कन्या, शिवाय नंतर राजघराण्याचा सारा कारभार मार्थालाच सांभाळायचा आहे, या हेतूनं राजानं लहानपणापासून तिला त्या पद्धतीनंच तयार केलं होतं.

Maharashtra Political Crisis News Live: सत्तासंघर्षाच्या निकालाकडे देशाचं लक्ष; नहरळी झिरवळ पोहोचले गावी

पण मार्था जसजशी मोठी होत गेली, तसतसं राजघराण्याला न शोभणारे निर्णय घ्यायला तिनं सुरुवात केली. महाराणीपदाची दावेदार असतानाही एका अर्थानं तिनं आपल्या वडिलांना आणि राजसत्तेलाच आव्हान द्यायला सुरुवात केली. त्यामुळे जनता तर तिच्यावर नाराज झालीच; पण राजानंही ती राजगादीची वारसदार असणार नाही, असं जाहीर करून टाकलं; पण मार्था त्याहीपुढची. तिनं अप्रत्यक्षपणे राजालाच सुनावलं, तुमच्या राजसत्तेची मी भुकेली नाही. मी माझ्या पद्धतीनंच जगणार आणि माझ्या आयुष्याचे निर्णय मी स्वत:च घेणार. त्यात दखल घेण्याचा अधिकार कोणालाच नाही..

पण मार्थानं असं केलं तरी काय, ज्यामुळे जनता आणि नॉर्वेचा राजाही तिच्यावर नाराज आहे? - राजकुमारी मार्थाचं सध्या एक प्रेमप्रकरण चालू आहे. अमेरिकेत राहाणाऱ्या आफ्रिकी वंशाच्या एका ‘मांत्रिका’शी, ‘जादुगारा’शी मार्थाचं सूत जुळलं आहे. जादूनं आपण अनेक गोष्टी करू शकतो, अगदी रुग्णांनाही ठणठणीत बरं करू शकतो, असा दावा हा जादूगार करतो. त्याचं नाव आहे ‘शामन डुरेक’. कोरोनाच्या रुग्णांना आपण बरं करू शकतो, असा दावा त्यानं कोरोनाकाळातही केला होता. त्यामुळे त्याला तुरुंगाची हवाही खावी लागली होती. यातून तरी राजकुमारी मार्थानं सुधारावं ना; पण ती उलट या ‘जादुगारा’च्या आणखीच कह्यात गेली आहे. एवढंच नाही, ती स्वत:च आता ‘जादूटोणा’ करायला लागली आहे. राजघराण्याच्या ऐशोआरामी जिंदगीतून ती आता बाहेर पडली आहे. एका छोट्याशा फ्लॅटमध्ये ती राहते. डुरेकच्या नादी लागून गंडेदोरे  विकते. आपली रया तिनं स्वत:हूनच घालवून टाकली आहे, प्रेमापुढे ती आंधळी झाली आहे, राजघराण्याची शान, प्रतिष्ठा मातीत मिळवून ती स्वत:ही दळभद्री आयुष्य जगते आहे, आमच्या देशाची मान तिनं शरमेनं खाली झुकवली आहे, असं नॉर्वेची जनताच आता खुलेआम म्हणू लागली आहे.

राजघराण्यात राहात असतानाच ‘एंजल स्कूल’ नावाची एक कम्युनिटी तिनं तयार केली होती. तिचा दावा आहे की देव-देवता आणि आत्म्यांशी ती संपर्क साधू शकते. त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलू शकते. त्यांच्या मदतीनं रुग्णांना नुसतं ठणठणीत बरं करणंच नव्हे, तर त्यापेक्षाही अनेक गोष्टी ती करू शकते.. युरोप आणि नॉर्वेच्या लोकांना मात्र ही सगळी ‘छा-छू’गिरी वाटते. कारण बहुतांश लोकांचा यावर विश्वास नाही.

पहिल्या पतीनं केली आत्महत्या!

५१ वर्षीय मार्थाचा पहिला विवाह २००२मध्ये झाला होता. त्यांना तीन मुलंही झाली; पण मतभेदांमुळे २०१७मध्ये मार्था पतीपासून विभक्त झाली. या घटनेच्या आघातानं तिचा लेखक पती नैराश्यात गेला आणि २०१९मध्ये त्यानं आत्महत्या केली. या आत्महत्येला मात्र ती मीडियाला जबाबदार धरते. मीडियानं तिच्या अफेअरची चर्चा विनाकारण रंगवल्यानं पती नैराश्यात गेला आणि त्यातूनच त्यानं आत्महत्या केली, असं तिचं म्हणणं आहे.