Saurabh Chandrakar Detained : महादेव बुक बेटिंग ॲप प्रकरणात भारताच्या तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. या बेटिंग ॲपचा मालक सौरभ चंद्राकर याला इंटरपोलने ताब्यात घेतले असून, त्यानंतर त्याला भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाचे पथक महादेव ॲपचा मालक सौरभ चंद्राकरला एका आठवड्याच्या आत भारतात आणू शकते. गेल्या वर्षी सौरभ चंद्राकरला ताब्यात घेण्यात आले होते आणि तेव्हापासून तो पोलिसांच्या ताब्यात होता. त्यानंतर आता सौरभवर पुढील कारवाई करण्यात आली असून लवकरच त्याला भारतात आणलं जाणार आहे.
महादेव बेटिंग ॲप प्रकरणात भारतीय तपास यंत्रणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बेटिंग ॲपचा मालक सौरभ चंद्राकर याला इंटरपोलने ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्याला भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयची टीम महादेव ॲपच्या मालकाला लवकरच भारतात आणणार आहे. इंटरपोलने यासंदर्भात सीबीआयला माहिती दिली आहे. या प्रकरणी ईडीने यापूर्वीच रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. महादेव ॲपचा मास्टरमाइंड सौरभ चंद्राकरचा डी कंपनीशी संबंध असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. महादेव ॲपविरोधात देशातील अनेक राज्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या ॲपबाबत तपास यंत्रणा ईडीकडे तक्रारही करण्यात आली होती.
सौरभ चंद्राकरच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. रेड कॉर्नर नोटीस जारी झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये सौरभ चंद्राकरला यूएईमध्ये कारवाई करण्यात आली. ईडीच्या कारवाईवरून सौरभला २०२३ मध्ये ताब्यात घेण्यात आले होते. सौरभ चंद्राकरला परत आणण्यासाठी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांमध्ये सहमती झाली आहे. सौरभ चंद्राकर हा सुमारे ५ हजार कोटींच्या फसवणुकीचा सूत्रधार आहे. याप्रकरणात ईडीने रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांना चौकशीसाठी बोलावले होते. तू झुठी मैं मक्कारच्या या कलाकारांना ॲपच्या प्रचारासाठी पैसे मिळाल्याची माहिती आहे. बेटिंग ॲपवरून मिळालेल्या पैशाच्या स्त्रोताची माहिती देण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले होते.
दुसरीकडे, कपिल शर्मा, हुमा कुरेशी आणि हिना खान यांना फेब्रुवारीमध्ये दुबईत एका लग्नात परफॉर्म केल्यानंतर चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. हवालाच्या पैशातून या सेलिब्रिटींना पैसे दिल्याचे ईडीने उघड केले होते. चंद्राकरच्या लग्नासाठी १७ बॉलिवूड सेलिब्रिटींना चार्टर्ड फ्लाइटने दुबईत आणण्यात आले होते, असे ईडीने सांगितले. या सर्वांना हवालाद्वारे कोट्यवधी रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे.
महादेव ॲपवर देशातील अनेक राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. या ॲपबाबत ईडीमध्ये तक्रारही करण्यात आली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये सौरभ चंद्राकरला दुबईत नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर ५ नोव्हेंबर २०२३ रोजी केंद्र सरकारने महादेव बेटिंग ॲपसह २२ बेकायदेशीर बेटिंग ॲप आणि वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश दिले. ईडीच्या शिफारशींनंतर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ए अंतर्गत आदेश जारी करण्यात आले. तसेच ८ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबई पोलिसांनी महादेव बेटिंग ॲप आणि त्याच्या प्रवर्तकांविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आरोपींवर फसवणूक आणि जुगार खेळल्याचा आरोप होता. या प्रकरणी सौरभ चंद्राकर, रवी उप्पल यांच्यासह ३० हून अधिक जणांवर माटुंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो नंतर मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता आणि नंतर तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती.